‘मिस जपान’च्या निवडीवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2016 03:52 AM2016-09-06T03:52:27+5:302016-09-06T03:52:27+5:30
प्रियंका योशीकावा (२२) या तरुणीला ‘मिस जपान’चा बहुमान मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
टोकियो : प्रियंका योशीकावा (२२) या तरुणीला ‘मिस जपान’चा बहुमान मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या तरुणीचे वडील भारतीय, तर आई जपानी आहे. त्यामुळे या ‘हाफ इंडियन’ तरुणीच्या निवडीवरून सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. मिस युनिव्हर्स जपान ही पूर्णपणे जपानी असावी, अर्धवट नव्हे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत. भारताशी संबंधित ही तरुणी हत्तींना प्रशिक्षणही देते; मात्र प्रियंका योशीकावाच्या या निवडीने वर्णभेदाचा वाद सुरू झाला आहे. प्रियंकाचा जन्म टोकियोतील आहे; पण तिचे वडील भारतीय आहेत. प्रियंका म्हणाली की, होय, आम्ही जपानी आहोत. मी अर्धी भारतीय आहे. माझे वडील भारतीय आहेत आणि मला याचा गर्व आहे; पण याचा अर्थ असा नाही की, मी जपानी नाही. जपानी आणि इंग्रजी बोलणारी योशीकावा आता डिसेंबर महिन्यात वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होणार आहे.(वृत्तसंस्था)