इसिसला संपवण्याचा निर्धार!
By admin | Published: November 22, 2015 04:19 AM2015-11-22T04:19:40+5:302015-11-22T04:19:51+5:30
इसिस’ आणि अन्य अतिरेकी संघटना यांचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी आपले प्रयत्न दुप्पट करावेत आणि याबाबत संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी करणारा फ्रान्सचा
कारवाईला सुरक्षा परिषदेची मंजुरी : सर्व देशांनी आपले प्रयत्न दुप्पट करावेत
संयुक्त राष्ट्रे : ‘इसिस’ आणि अन्य अतिरेकी संघटना यांचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी आपले प्रयत्न दुप्पट करावेत आणि याबाबत संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी करणारा फ्रान्सचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संमत केला आहे. त्यामुळे इसिसच्या विरोधात उभे जग एकवटण्याच्या प्रक्रियेला बळ मिळणार आहे.
‘इसिस’ या संघटनेपासून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला एक जागतिक धोका निर्माण झाला आहे. या धोक्याचा सर्व माध्यमांद्वारे मुकाबला करण्यास
सुरक्षा परिषद वचनबद्ध आहे, असे ठरावात म्हटले आहे.
पॅरिससारखाच हल्ला घडवून आणला जाण्याचे संकेत मिळाल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सला छावणीचे रूप आले असून, राजधानीतील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे; शिवाय सर्व दुकानेही बंद करण्यात आली आहेत. पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड बेल्जियमचा होता. त्यामुळे बेल्जियममध्ये घातपात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सिरियात ३६ ठार
सीरियात ‘इसिस’चे नियंत्रण असणाऱ्या दीर एजोर प्रांतात रशियन आणि सिरियन जेट विमान बॉम्बहल्ल्यात ३६ जण ठार झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रात निरीक्षकांनी दिली.
‘सीरियन आॅब्झर्व्हेटरी फॉर ‘ह्युमन राईट्स’ या संघटनेचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी ही माहिती देताना सांगितले की, या विभागात लढाई सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वांत भीषण हल्ला होता.
गेल्या आठवड्यातच पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२० जण ठार आणि ३५० जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.