Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:08 PM2021-07-09T14:08:45+5:302021-07-09T14:09:15+5:30

Deep Dive Dubai: दुबईचे क्राऊन प्रिन्स हमगन बिन मोहम्मद अल मकतून यांनी शेअर केला Deep Dive Dubai चा आकर्षक व्हिडीओ. पाहा व्हिडीओ.

deep dive dubai world biggest pool open-to the public watch epic video 196 feet deep world record | Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल

Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल

googlenewsNext
ठळक मुद्देदुबईचे क्राऊन प्रिन्स हमगन बिन मोहम्मद अल मकतून यांनी शेअर केला Deep Dive Dubai चा आकर्षक व्हिडीओ.

पाणी पाहिलं की अनेकांना पोहण्याचा मोह आवरत आहे. पाणी जितकं खोल तितका थरारही अधिक आणि त्याच्याप्रति लोकांचं आकर्षणही वाढत जातं. अशा परिस्थितीत दुबईचे क्राऊन प्रिन्स हमदन बिन मोहम्मद अल मकतूम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दुबईच्या डीप डाईव्ह पूलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओनंतर लोकांकडून त्याबद्दल उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत. संपूर्ण जग तुमचं डीप डाईव दुबईमध्ये वाट पाहत आहे, असा संदेशही त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिला आहे. हा जगातील सर्वात खोल असलेला पूल आहे. याची खोली ६० मीटर म्हणजेच १९६ फुट आहे. क्राऊन प्रिन्स यांनी शेअर केलेल्या व्हिडीओध्ये काही स्विमर्स पूलमध्ये डाईव करताना दिसत आहेत.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं गेल्या महिन्यात या पूलाच्या खोलीबाबत माहिती पडताळली होती. त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार क्राँक्रिटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पूलची खोली ६०.०२ मीटर आहे. याशिवाय यामध्ये अधिक खोल गेल्यावर निरनिराळ्या थीम्सही दिसून येतात. यामध्ये डायविंगच्या अनुभवासाठी अनेक प्रकार वापरण्यात आले आहे. सुरूवातीला याचा वापर केवळ खासगी वापरासाठी करण्यात येत होता. परंतु या महिन्यापासून सर्वांना या पूलचा आनंद घेता येणार आहे.


यापूर्वी १५० फुटाचा रिकॉर्ड
डीप डाईव दुबईच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार हा पूल लवकरच सर्वांसाठी खुला केला जाणार आहे. तसंच सर्वांना याचा अनुभव घेता येणार आहे. या पूलच्या ओपनिंगशी निगडीत सर्व अपडेट्ससाठी आपल्याशी जोडून राहण्याचं आवाहनही त्यांनी केला आहे. यापूर्वी जगातील सर्वात खोल असलेल्या पूलाचा विक्रम पोलंडच्या डीपस्पॉटच्या नावे होते. याची खोली ४५.५ मीटर म्हणजेच १५० फूट होती.

Web Title: deep dive dubai world biggest pool open-to the public watch epic video 196 feet deep world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.