चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानंतर आता संरक्ष मंत्री बेपत्ता; दोन आठवड्यांपूर्वी शेवटचे दिसले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 06:09 PM2023-09-11T18:09:55+5:302023-09-11T18:10:11+5:30

काही दिवसांपूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक बेपत्ता झाले होते.

Defense Minister missing after China's foreign minister; Last seen two weeks ago | चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानंतर आता संरक्ष मंत्री बेपत्ता; दोन आठवड्यांपूर्वी शेवटचे दिसले

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानंतर आता संरक्ष मंत्री बेपत्ता; दोन आठवड्यांपूर्वी शेवटचे दिसले

googlenewsNext

बीजिंग: चीनमधून आणखी एक मंत्री बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सरकारमधील संरक्षण मंत्री ली शांगफू (China Defense Minister Li Shangfu) जवळपास दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ते कुठे, आहेत याची कोणालाच माहीत नाही. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विविध अफवा पसरत आहेत.

जपानमधील युनायटेड स्टेट्सचे राजदूत रेहम इमॅन्युएल यांनी गेल्या शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल टिप्पणी केली होती. बेपत्ता होण्याचे हे चीनमधील दुसरे मोठे प्रकरण आहे. याआधी माजी परराष्ट्र मंत्री किन गँगदेखील अचानक गायब झाले होते. 

ली शांगफू कोण आहे?
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये केंद्रीय लष्करी आयोगाचा राजीनामा देणाऱ्या वेई फेंगे यांच्या जागी ली शांगफू यांना या वर्षी मार्चमध्ये चीनचे संरक्षण मंत्री बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे, पूर्वीच्या चिनी संरक्षण मंत्र्यांप्रमाणे ली हे लष्करी कुटुंबातून आलेले आहेत. लीचे दिवंगत वडील ली शाओझू हे रेड आर्मीत होते. 

ली शांगफू बेपत्ता झाल्याची अफवा
जपानमधील यूएस राजदूत राहम इमॅन्युएल यांनी केलेल्या ट्विटनंतर ली शांगफू 'गायब' झाल्याची बातमी X (पूर्वीचे ट्विटर) वर पसरली. हाँगकाँग स्थित इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, त्यांना अखेरचे 29 ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये चीन-आफ्रिका मंचाला संबोधित करताना पाहिले गेले होते.

Web Title: Defense Minister missing after China's foreign minister; Last seen two weeks ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.