९४ व्या वर्षी मिळविली महाविद्यालयातून पदवी
By admin | Published: May 10, 2015 11:44 PM2015-05-10T23:44:29+5:302015-05-10T23:44:29+5:30
अमेरिकेतील एका व्यक्तीने वयाच्या ९४ व्या वर्षी पदवी मिळविली. पदवीसाठी या व्यक्तीस तब्बल ७५ वर्षे लागली.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका व्यक्तीने वयाच्या ९४ व्या वर्षी पदवी मिळविली. पदवीसाठी या व्यक्तीस तब्बल ७५ वर्षे लागली.
दुसऱ्या महायुद्धात सामील होण्यापूर्वी मोरगनटाऊनच्या अँथनी ब्रुटो यांनी १९३९ मध्ये पूर्व व्हर्जिनिया विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश घेतला होता. १९४२ मध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांना महाविद्यालय सोडण्याची वेळ आली. यानंतर ते सैन्यात सामील झाले व दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत सुमारे साडेतीन वर्षे सेवा दिली.
युद्धानंतर त्यांनी सिमेंट कारखान्यात पिता व भावांसोबत काम करण्यास प्रारंभ केला. तथापि, ते कॉलेजला जाण्यास इच्छुक होते. १९४६ मध्ये त्यांनी पुन्हा प्रवेश घेतला. मात्र पदवी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पुन्हा एकदा शिक्षण सोडावे लागले. कारण आजारी पत्नीची काळजी घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले. ब्रुटो हे विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वाधिक वयाचे पदवीधर असल्याचे मानले जात आहे. (वृत्तसंस्था)
त्यांना १७ मे रोजी सुमारे ४,५०० विद्यार्थ्यांसह पदवी प्रदान केली जाईल. (वृत्तसंस्था)