विमान दुर्घटनेच्या चौकशीची मागणी
By admin | Published: July 23, 2014 03:44 AM2014-07-23T03:44:09+5:302014-07-23T03:44:09+5:30
युक्रेनमध्ये मलेशियन विमान पाडण्याच्या घटनेची आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करणारा एक ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला.
Next
संयुक्त राष्ट्र : युक्रेनमध्ये मलेशियन विमान पाडण्याच्या घटनेची आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करणारा एक ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला. या ठरावामध्ये तपास पथकांना विनाअडथळा दुर्घटनास्थळार्पयत जाऊ देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाने तयार केलेल्या या प्रस्तावाला 15 सदस्यीय परिषदेने सोमवारी मंजुरी दिली. या ठरावामध्ये मलेशियन विमान पाडण्याच्या घटनेची घोर निर्भर्त्सना करण्यात आली आहे. 17 जुलै रोजी झालेल्या या घटनेत 298 जण मारले गेले होते. सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आणि नकाराधिकाराचा अधिकार असलेल्या रशियानेही या ठरावाचे समर्थन केले.
(वृत्तसंस्था)
4पूर्व युक्रेनमध्ये अपघातग्रस्त झालेल्या एमएच 17 विमानाचा ब्लॅकबॉक्स बंडखोरांनी मंगळवारी मलेशियन अधिका:यांकडे सोपविला. घटनास्थळी बंडखोरांनी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. या घोषणोमुळे तपास पथकाला घटनास्थळाची न्यायवैद्यक तपासणी करण्याकरिता जाणो सोयीस्कर होणार आहे.
4गेल्या आठवडय़ात पूर्व युक्रेनमध्ये पाडण्यात आलेल्या मलेशियन विमानाच्या अवशेषांवर क्षेपणास्त्र हल्ल्याच्या खुणा स्पष्ट दिसून येतात.
4दोन पत्रकारांनी या अवशेषांचे छायाचित्रण केले.
क्षेपणास्त्रच्या हल्ल्यामुळेच या विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे या छायाचित्रंतून दिसून येते, असे एका लष्करी संस्थेने म्हटले आहे.