निदर्शनांमुळे निमलष्करी दले तैनात
By admin | Published: August 19, 2014 01:34 AM2014-08-19T01:34:15+5:302014-08-19T01:34:15+5:30
रस्त्यांवर उतरलेल्या अश्वेत निदर्शकांना आवर घालणो कठीण झाल्यामुळे अखेर या शहरात निमलष्करी दले तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Next
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या फग्यरुसन शहरात मायकल ब्राऊन या 18 वर्षीय अश्वेत मुलास पोलिसांनी ठार मारल्याच्या निषेधार्थ रस्त्यांवर उतरलेल्या अश्वेत निदर्शकांना आवर घालणो कठीण झाल्यामुळे अखेर या शहरात निमलष्करी दले तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या गव्हर्नरांनी निमलष्करी दलांची तैनाती करण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली.
मायकल ब्राऊन याला पोलिसांनी गोळय़ा घालून ठार केल्याची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती. त्यानंतर शहरात पोलिसांविरुद्ध संतापाची लाट उसळली असून, मायकलच्या कुटुंबियांनी शांततेचे आवाहन करूनही निदर्शकांनी माघार न घेता पोलिसांविरुद्ध निदर्शनांचे सत्र सुरूच ठेवले आहे. निदर्शकांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यासह गोळीबारही केल्याचे वृत्त आहे.
ज्या अधिका:याने ब्राऊनला गोळय़ा घातल्या त्यांना ब्राऊनने जवळच्या दुकानातून चोरी केल्याची माहिती नव्हती. तो वाहतूक थांबवीत रस्त्याने जात असल्याने या अधिका:याने त्याला हटकले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जारी केलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक अश्वेत व्यक्ती दुकानातील एका क्लर्कला धमक्या देत असल्याचे दिसते.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मायकल ब्राऊनच्या मृत्यूप्रकरणी न्याय विभागामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले असतानाही निदर्शक माघार घेण्यास तयार नसल्याने निमलष्करी दलाच्या तैनातीची वेळ आली. (वृत्तसंस्था)