देशपरदेश -जपानमध्ये मोदी
By admin | Published: September 2, 2014 07:35 PM2014-09-02T19:35:24+5:302014-09-02T19:35:24+5:30
भारतीय समाजाच्या रक्तातच
Next
भ रतीय समाजाच्या रक्तातचशांतता आणि अहिंसा- मोदी----------------टोक्यो : शांतता आणि अहिंसेशी भारताची बांधिलकी ही भारतीय समाजाच्या रक्तातच रुजलेली असून ती कोणतेही आंतरराष्ट्रीय करार किंवा प्रक्रियांच्या पलीकडील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) भारत स्वाक्षरी करीत नसल्याबद्दल जगात जी चिंता व्यक्त केली जाते त्या पार्श्वभूमीवर मोदी सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. मोदी म्हणाले,'भारत ही भगवान गौतम बुद्धांची भूमी असून त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य शांततेसाठी झिजविले. शांततेसाठी त्यांनी त्रास भोगला आणि त्यांचा तो संदेश भारतभर पसरलेला आहे.'भारताकडे अण्वस्त्रे असताना त्याने अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत भारत आपली भूमिका न बदलता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:बद्दल विश्वास कसा वृद्धिंगत करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मोदी यांनी भारताने ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाची अहिंसेशी बांधिलकी राखत कसा लढला व त्याने जग कसे आश्चर्यचकित झाले, याचा दाखला दिला. भारताची अहिंसेशी पूर्ण बांधिलकी असल्याचे मोदी यांनी ठामपणे सांगितले. अण्वस्त्रे प्रसारबंदी करार हा दोषपूर्ण असल्याचे सांगून भारताने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे.