अपंग असूनही व्हील चेअरवर केला २८०० कीमीचा प्रवास
By admin | Published: March 18, 2016 07:55 PM2016-03-18T19:55:41+5:302016-03-18T20:10:25+5:30
क्वेन पैंग या २९ वर्षीय चीनी तरुणाने २८०० कीलोमीटरचा प्रवास हा व्हीलचेअर बसून केला आहे. ५६६ दिवसापुर्वी त्याच्या या प्रवासास सुरवात झाली होती.
Next
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. १८ - क्वेन पैंग या २९ वर्षीय चीनी तरुणाने २८०० कीलोमीटरचा प्रवास हा व्हीलचेअर बसून केला आहे. ५६६ दिवसापुर्वी त्याच्या या प्रवासास सुरवात झाली होती. आजही ती तशीच आहे. जन्मताच अपंग असणाऱ्या क्वेनने हा धाडसी प्रयत्न केला आहे. आपल्या अपंगत्वावर मात करत व्हील चेअरवर बसून त्याने चीन भ्रमन केले. २०१४ साली त्याच्या प्रवासाला सुरवात झाली . आतापर्यंत वेगवेगळ्या २२ शहरात त्यांने व्हील चेअरवरुन प्रवास केला आहे. सदरील सर्व माहीती व्हायरल शॉटवरुन मिळाली आहे.
व्हील चेअरवरुन प्रवास करताना नागरीकांला पाहून त्याच्याबद्दल आदर वाटतो तसेच त्याच्या या जिद्दीचं त्यांना आपल्या प्रत्येक कामात प्रोत्साहन मिळत आलेलं आहे. क्वेनची २२ शहरानंतरही यात्रा अजून थांबलेली नाही तो यापुढेही ती चालूच ठेवणार आहे. क्वेनच व्हीलचेअरवरुन सगळं जग फिरण्याचं स्वप्न आहे. या जगात कोणीही कमजोर अथवा कमी नसते हे त्याला जगाला दाखवयाचे आहे.