विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 08:03 AM2024-05-21T08:03:51+5:302024-05-21T08:05:52+5:30

रईसी हे पूर्वी मौलवी होते. त्यांनी एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलण्याआधी इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणची प्रत हाती घेतली होती.

Despite opposition, Raisi took Iran closer to enriched uranium | विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ

विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ

दुबई : इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या आदेशानुसार १९८८ साली त्या देशात अनेकांना सामुदायिक फाशीची शिक्षा देण्यात आली. त्या गोष्टीचे पालन होण्यासाठी यंत्रणांवर बारीक लक्ष ठेवण्याचे, अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे समृद्ध युरेनिअम बनविण्याच्या जवळ इराणला पोहोचविण्याचे काम कट्टरपंथी नेते व राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केले होते. रविवारी रात्री झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा व त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला.

रईसी हे पूर्वी मौलवी होते. त्यांनी एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलण्याआधी इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणची प्रत हाती घेतली होती. २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांचा हसन रुहानी यांनी पराभव केला होता. त्यानंतर चार वर्षांनी रईसी राष्ट्राध्यक्ष होतील अशी नेपथ्यरचना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी केली होती. 

इराणच्या अणू कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी पाहणी करावी म्हणून इस्रायलने चालविलेल्या मोहिमेविरोधात इब्राहिम रईसी यांनी आवाज उठविला हाेता. अमेरिका घालत असलेले निर्बंध हे जगातील देशांशी युद्ध छेडण्याची एक नवी रणनीती आहेे, असे त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सप्टेंबर २०२१मध्ये सांगितले होते. 

इराणच्या परराष्ट्र धोरणावर रईसी यांची छाप
- इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दोल्लाहियान (वय ६० वर्षे) हे देखील कट्टरपंथी नेते होते. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी तसेच राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या विचारांनुसार हुसैन यांनी त्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची आखणी केली होती. त्यांचाही रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.

- इराणचा अमेरिकेला असलेला तीव्र विरोध, युक्रेन युद्धात इराणने रशियाला पुरविलेली बॉम्बवाहू ड्रोन, इराणने इस्रायलवर केलेले हल्ले, दहशतवादी गटांना पुरविलेली मदत या सर्व घटना हुसैन अमीराब्दोल्लाहियान यांच्या कार्यकाळात घडल्या.

अझरबैजानमधील धरणाच्या उद्घाटनावेळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहम अलीयेव्ह यांच्यासाेबतची इब्राहिम रईसी यांची ही भेट अखेरची ठरली.

- इराणमध्ये इस्लामी क्रांती झाल्यानंतर त्यानुसार व्यवस्थाबदल करण्यात ज्यांनी हातभार लावला त्यात रईसी यांचा समावेश होता.

रशियाला पुरविली हाेती ड्राेन
रईसी यांच्या कार्यकाळात, इराणने युरेनियमचे शस्त्रास्त्र-दर्जाच्या पातळीच्या जवळ नेहमीपेक्षा अधिक समृद्ध केले, ज्यामुळे पश्चिमेसोबतचा तणाव आणखी वाढला, कारण तेहरानने युक्रेनमधील युद्धासाठी आणि संपूर्ण प्रदेशातील सशस्त्र मिलिशिया गटांना रशियाला बॉम्ब वाहून नेणारे ड्रोनदेखील पुरवले. 

इराणची बिघडलेली आर्थिक स्थिती, महिलांच्या अधिकारांबद्दल तेथील सरकारने घेतलेली संकुचित भूमिका याबद्दल त्या देशात उग्र निदर्शने झाली होती. रईसी यांच्या कार्यकाळात इराण अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे समृद्ध युरेनिअम बनविण्याच्या जवळ इराण पोहोचला होता. तसेच युक्रेन युद्धात रशियाला बॉम्ब वाहून नेणारी ड्रोन पुरविणाऱ्या इराणवर पाश्चिमात्य देशांचा रोष आणखी वाढला होता. इराणने काही दहशतवादी गटांनाही मदत केली होती.

Web Title: Despite opposition, Raisi took Iran closer to enriched uranium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.