India Support China: अमेरिकेचा विरोध तरी भारत चीनसोबत आला; ग्लोबल टाईम्सला उकळ्या फुटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 01:18 PM2021-11-30T13:18:59+5:302021-11-30T13:20:09+5:30

India Support China Against America: भारत, रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची 18 वी बैठक गेल्या आठवड्यात व्हिडिओ लिंकद्वारे झाली. या बैठकीत भारत आणि रशियाने चीनला पाठिंबा दिला आहे.

Despite US opposition, India and Russia Support China on Winter Olympic Boycott issue | India Support China: अमेरिकेचा विरोध तरी भारत चीनसोबत आला; ग्लोबल टाईम्सला उकळ्या फुटल्या

India Support China: अमेरिकेचा विरोध तरी भारत चीनसोबत आला; ग्लोबल टाईम्सला उकळ्या फुटल्या

googlenewsNext

चीन आणि भारतामध्ये भलेही सीमा वाद असला तरी काही परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांसोबत उभे ठाकलेले आगेत. नुकत्याच झालेल्या जलवायू परिवर्तन संमेलनात सीओपी-26 मध्ये भारत आणि चीनने एकजुट दाखविली होती. यामुळे पश्चिमेकडील देश नाराज झाले होते. आता पुन्हा भारताने अमेरिकेविरोधात चीनची बाजू घेतल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.


भारत, रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची 18 वी बैठक गेल्या आठवड्यात व्हिडिओ लिंकद्वारे झाली. या बैठकीत भारत आणि रशियाने चीनला पाठिंबा दिला आहे.गेल्या काही वर्षांपासून भारत आणि अमेरिकेमध्ये भू राजनैतिक संबंध चांगले झाले आहेत. अमेरिका बिजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवर युरोप आणि ऑस्ट्रेलियाच्या मदतीने राजकीय बहिष्कार टाकण्याची तयारी करत आहे. यावरून तणाव असताना भारताने चीनला पाठिंबा दिल्याने अमेरिका नाराज झाला असून चिनी मिडीयाला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. 

ग्लोबल टाईम्सने लिहिले की, बिजिंग 2022 च्या ऑलिम्पिक खेळांप्रति भारताचे वागणे म्हणजे भारत कूटनिती आणि रणनितीमध्ये स्वतंत्र आहे हे दर्शविते. अमेरिकेसोबत चांगले संबंध असले तरी भारताने तसे केलेले नाही. भारत अमेरिकेचा गृहीत धरलेला सहकारी नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. भारताला जपान किंवा ऑस्ट्रेलियासारखा अमेरिकेचा छोटा भाऊ बनून रहायचे नाहीय. तर सुपर पॉवर बनायचे आहे. यामुळे भारत अमेरिकाचा स्वाभाविक सहकारी बनण्याची शक्यता कमी आहे. 

बीजिंग 2022 हिवाळी ऑलिंपिक खेळांव्यतिरिक्त, रशिया, चीन आणि भारताच्या तीन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात इतर क्षेत्रांमध्येही सहमतीचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, लसीच्या डोसची देवाणघेवाण, तंत्रज्ञान हस्तांतरण, स्थानिक उत्पादन क्षमता विकसित करणे आणि औषधांच्या पुरवठा साखळीला प्रोत्साहन देणे याद्वारे कोविड-19 साथीच्या आजाराच्या संदर्भात सतत सहकार्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. 

नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाचे संचालक कियान फेंग यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितले की, "भारताला बाहेरील जगाला सकारात्मक संकेत द्यायचा आहे की भारत चीनसोबतचा संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बिघडलेले असताना ते सुधरू देखील शकतात.

Web Title: Despite US opposition, India and Russia Support China on Winter Olympic Boycott issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.