इसिसने उद्ध्वस्त केली प्रख्यात मशीद
By admin | Published: June 23, 2017 12:13 AM2017-06-23T00:13:04+5:302017-06-23T00:13:04+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेने मोसूलमधील प्रसिद्ध अल-नूरी मशीद बुधवारी स्फोटाद्वारे उद्ध्वस्त केली. इसिसचा नेता अबू बकर अल-बगदादी याने याच मशिदीतून
बगदाद : इसिस या दहशतवादी संघटनेने मोसूलमधील प्रसिद्ध अल-नूरी मशीद बुधवारी स्फोटाद्वारे उद्ध्वस्त केली. इसिसचा नेता अबू बकर अल-बगदादी याने याच मशिदीतून खिलाफतची घोषणा केली होती. ही मशीद इसिसने स्फोटाने नष्ट केल्याची माहिती इराकी सैन्यानं दिली. मात्र मशीद अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाच्या हल्ल्यात नष्ट झाल्याचा आरोप इसिसने केला आहे. अमेरिकेने मात्र इसिसचा दावा फेटाळून लावला.
बगदादीने जुलै २0१४ मध्ये येथे एक सभा घेऊन नवीन इस्लामिक राज्य स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आठ आठवड्यांमध्ये इसिसने मोसूल शहरावर कब्जा केला होता. ही मशीद १८ व्या शतकात बांधण्यात आली होती ही मशीद उडवणे म्हणजे इसिसने पराभव मान्य करण्यासारखे आहे, असे इराकचे इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी म्हटले आहे. इराकी सैन्यानेही ही मशीद पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्ल्याचे जाहीर केले आहे.
अमेरिकी सैन्याच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून मोसूलमध्ये इसिसविरोधात लढाई सुरू आहे. चौथ्या दिवशी इसिसने ही मशीद उद्ध्वस्त करून आपला पराभव मान्य केला, असाच इराकमध्ये अर्थ लावला जात आहे. इसिसनं नूरी मशिदीसोबत अल हब्दा नावाची आणखी एक इमारतही नष्ट केली. ही इमारत नूरी मशिदीच्या समोर होती.