म्यानमारमध्ये "खुनी फेस्टिव्हल", पाण्याच्या खेळात 285 जणांचा मृत्यू
By admin | Published: April 18, 2017 05:45 PM2017-04-18T17:45:25+5:302017-04-18T17:47:24+5:30
म्यानमारमध्ये पारंपारिक थिंगयान वॉटर फेस्टिव्हलमध्ये 285 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 1073 लोकं यामध्ये जखमी झाली आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
यांगून, दि. 18 - म्यानमारमध्ये पारंपारिक थिंगयान वॉटर फेस्टिव्हलमध्ये 285 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 1073 लोकं यामध्ये जखमी झाली आहेत. गुरूवार (दि.13) ते रविवार (दि.16) दरम्यान हा पाण्याचा खेळ येथे खेळला गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृतांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी वॉटर फेस्टिव्हलमध्ये 272 जणांचा मृत्यू झाला होता, तर 1086 लोकं जखमी झाली होती.
नववर्षाच्या स्वागतासाठी म्यानमारमध्ये दरवर्षी वॉटर फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. यावर्षी हा फेस्टिव्हल गुरूवार (दि.13) ते रविवार (दि.16) दरम्यान पार पडला. यादरम्यान एकमेकांवर पाण्याचा जोरदार मारा केला जातो. याशिवाय अनेक शहरांत वॉटर पार्टीचं आयोजन केलं जातं. मृतकांपैकी 10 नेपीथा, 44 यांगून, 36 मांडले, 26 सागेंग, 11 तानिनतेरई, 37 बागो, 11 माग्वे, 20 मोन स्टेट, 17 राखिने, 29 शान और 28 अयेयावाड्डे या शहरांतून आहेत.
यावर्षी 285 जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून सरकारकडून देण्यात आलेलं नाही. 2015 आणि 2016 साली चेंगराचेंगरी, रस्ता अपघातांमुळे लोकांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं.