दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार

By admin | Published: November 23, 2015 11:51 PM2015-11-23T23:51:57+5:302015-11-23T23:51:57+5:30

भारत आणि मलेशियाने दहशतवादाशी लढण्याचा संकल्प सोमवारी केला व सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील आपल्या सामरिक संबंधांचा स्तर उंचावण्याचा निर्णय घेतला.

Determination to fight against terrorism | दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार

दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार

Next

पुत्राजया : भारत आणि मलेशियाने दहशतवादाशी लढण्याचा संकल्प सोमवारी केला व सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील आपल्या सामरिक संबंधांचा स्तर उंचावण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर मोदी संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलताना म्हणाले की,‘‘गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या देशांमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले व भारत आणि अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले करण्याचा सतत प्रयत्न होत आहे त्याकडे आम्ही जगाचे लक्ष वेधू इच्छितो.’’
भारत आणि मलेशियाने सोमवारी सायबर सुरक्षेसह तीन करारांवर स्वाक्षरी केली. उभयदेशांनी एकदुसऱ्याच्या पदव्यांना मान्यता देण्याच्या कराराला लवकरच मूर्त रूप देण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Determination to fight against terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.