कृष्णविवर शोधण्याची नवी पद्धती विकसित

By admin | Published: January 10, 2016 02:19 AM2016-01-10T02:19:44+5:302016-01-10T02:19:44+5:30

भारतीय वंशाच्या एका अमेरिकी प्राध्यापकाच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने कृष्णविवर शोधण्याची नवीन पद्धती विकसित केल्याचा दावा केला आहे. ते छोटी आकाशगंगा शोधण्यात

Developed a new method of finding black holes | कृष्णविवर शोधण्याची नवी पद्धती विकसित

कृष्णविवर शोधण्याची नवी पद्धती विकसित

Next

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या एका अमेरिकी प्राध्यापकाच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने कृष्णविवर शोधण्याची नवीन पद्धती विकसित केल्याचा दावा केला आहे. ते छोटी आकाशगंगा शोधण्यात आणि आकाशगंगेत असलेल्या बाहेरील थरातील तरंगाचा तपशील देईल.
रोसेस्टर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील सहायक प्राध्यापक सुकन्या चक्रवर्ती यांनी आकाशगंगेतील अंतर्गत संरचना आणि द्रव्यमान मोजण्यासाठी आकाशगंगेच्या डिस्कमधील तरंगाचा वापर केला. या संशोधनाचे निष्कर्ष चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष अ‍ॅस्ट्रोफिजिकल रिसर्च लेटर्सकडे सोपविण्यात आले आहेत. अदृश्य पार्टिकलला कृष्णविवर किंवा डार्क मॅटर म्हटले जाते. त्यात या ब्रह्मांडाचा ८५ टक्के भाग सामावला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Developed a new method of finding black holes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.