लोकां सांगे 'धर्मज्ञान', स्वतः....; कराचीमध्ये मंदिरावर हल्ला, मूर्तींची विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 05:14 PM2022-06-09T17:14:40+5:302022-06-09T17:28:33+5:30

Hindu temple vandalised in pakistan : कराची (Karachi) कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

'Dharmagyan' telling to people, itself ....; Hindu temple vandalised in Karachi, desecration of idols | लोकां सांगे 'धर्मज्ञान', स्वतः....; कराचीमध्ये मंदिरावर हल्ला, मूर्तींची विटंबना

लोकां सांगे 'धर्मज्ञान', स्वतः....; कराचीमध्ये मंदिरावर हल्ला, मूर्तींची विटंबना

Next

कराची : भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ज्ञानाचे धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) स्वतःच्या देशात काय सुरु आहे हे पाहण्याची गरज आहे. कराची शहरात एका हिंदू मंदिरात देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी (Local Police) ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायाच्या प्रार्थनास्थळांची नुकसानी केल्याचे  हे ताजे प्रकरण आहे. कराची कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात बुधवारी देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळे कराचीतील हिंदू समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, विशेषत: कोरंगी भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या भागातील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला केला. पुढे ते म्हणाले, आम्हाला नक्की माहित नाही की हल्ला कोणी आणि का केला?

कोरंगीचे स्टेशन प्रभारी यांनी गुन्हा दाखल केला
कोरंगीचे एसएचओ फारूख संजरानी यांनी सांगितले की, पाच ते सहा अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश केला आणि तोडफोड करून पळ काढला. मंदिरावर हल्ला करणाऱ्या अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात यापूर्वीही हल्ले झाले आहेत
यापूर्वी अनेकदा पाकिस्तानमध्ये जमावाकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये कोत्री येथील सिंधू नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक मंदिराला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केले होते. याप्रकरणी कोटरी जदतगे ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानात 75 लाख हिंदू
पाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये ७५ लाख हिंदू राहतात. तथापि, समुदायाचा असा विश्वास आहे की, देशात ९० लाखपेक्षा जास्त हिंदू आहेत. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे.

 

Web Title: 'Dharmagyan' telling to people, itself ....; Hindu temple vandalised in Karachi, desecration of idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.