हुकूमशहा किम जोंग उनचा नववर्षाचा खतरनाक संकल्प!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:05 PM2024-01-01T13:05:14+5:302024-01-01T13:06:20+5:30
सत्ताधारी कामगार पक्षाच्या प्रमुख बैठकीत किम यांनी ही माहिती दिली. देशाच्या शस्त्रागारातील शस्त्रास्त्रांचा साठा वाढवण्यासाठी उत्तर कोरिया चाचणी सुरू ठेवणार असल्याचे किम यांच्या टिपण्यांवरून स्पष्ट झाले आहे.
सेऊल : उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची हुकूमशाहीचे अनेक नमुने अधूनमधून पुढे येत असतात. त्यातचे ते जेवढे खतरनाक तेवढेच त्यांचे नववर्षाचे संकल्पही खतरनाक आहेत. २०२४ मध्ये देश तीन अतिरिक्त लष्करी हेरगिरी करणारे उपग्रह प्रक्षेपित करणार तसेच अधिक अण्वस्त्रे आणि आधुनिक मानवरहित युद्ध उपकरणे बनवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
सत्ताधारी कामगार पक्षाच्या प्रमुख बैठकीत किम यांनी ही माहिती दिली. देशाच्या शस्त्रागारातील शस्त्रास्त्रांचा साठा वाढवण्यासाठी उत्तर कोरिया चाचणी सुरू ठेवणार असल्याचे किम यांच्या टिपण्यांवरून स्पष्ट झाले आहे.
किम म्हणाले की उत्तर कोरियाविरुद्ध अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या कृती अनपेक्षित आहेत, ज्यामुळे कोरिया द्वीपकल्प आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे. गंभीर परिस्थितीत, लढाऊ प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आम्हाला त्वरित काम करण्याची आवश्यकता आहे.