हुकूमशहा किम जोंग उनच्या सिक्रेट मुलीचा पहिली PHOTO व्हायरल? केला जातोय असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:37 AM2022-09-27T11:37:19+5:302022-09-27T11:38:27+5:30

खरे तर, उत्तर कोरियामध्ये आयोजित एका कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान स्थानीय टीव्हीवर दिसत असलेली एक मुलगी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Dictator Kim Jong Un's Secret Daughter's First PHOTO Viral | हुकूमशहा किम जोंग उनच्या सिक्रेट मुलीचा पहिली PHOTO व्हायरल? केला जातोय असा दावा

हुकूमशहा किम जोंग उनच्या सिक्रेट मुलीचा पहिली PHOTO व्हायरल? केला जातोय असा दावा

Next

उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un) आपल्या कुटुंबाला नेहमीच कॅमेऱ्यापासून दूर ठेवतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसंदर्भात फारच कमी लोकांना माहिती आहे. यातच आता, एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोत दिसत असलेली मुलगी, किम जोंग उनची असल्याचा दावा केला जात आहे.

खरे तर, उत्तर कोरियामध्ये आयोजित एका कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान स्थानीय टीव्हीवर दिसत असलेली एक मुलगी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ही मुलगी किम जोंग-उन यांची एकांतप्रिय आणि एकुलती एक मुलगी असू शकते, असे अनेकांना वाटत आहे. किम जोंग यांच्या मुलीचे नाव जू-ए असे आहे.

गाण्यावर परफॉर्म करताना दिसली जू-ए -
यूकेतील डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, ती (जू-ए) या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर कोरियाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत दिसून आली होती. या कार्यक्रमात ती एक गाणे परफॉर्म करत होती. यावेळी कीम आणि त्याची पत्नी री सोल-जू देखील उपस्थित होते. किम जोंग यांची पत्नी री सोल-जू कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर मुलांना शाबासकी देतानाही दिसून आली.

2013 मध्ये झाला आहे जू-ए चा जन्म -
किम जोंग यांची कथित मुलगी जू-ए एक बाजूला शांतपणे उभी असलेली दिसत आहे. जसे ती री सोल-जू ला चांगल्या प्रकारे ओळखते. यावेळी इतर मुले उत्तर कोरियाचा हुकूमशहाच्या आजूबाजूला उभे असलेले दिसत आहेत. एवढेच नाही, तर कॅमेराही याच मुलीवर रोखून धरण्यात आलेला दिसत आहे. स्थानिक माध्यामांतील वृत्तांनुसार, जू-एचा जन्म 2013 मध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Dictator Kim Jong Un's Secret Daughter's First PHOTO Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.