हुकूमशहाची १० वर्षांची मुलगी राजकीय वारसदार?, 'जू एई'ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:38 PM2022-11-28T12:38:22+5:302022-11-28T12:38:53+5:30
आंतरखंडीय क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाने केलेली चाचणी पाहण्यासाठी किम जाँग उन याच्यासोबत त्याची मुलगी जू एई उपस्थित राहिली होती.
वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन हा क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करत असताना त्याची मुलगीही त्याप्रसंगीही उपस्थित असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ती मुलगी १० वर्षे वयाची असून तिचे नाव जू एई असे असल्याचे सांगण्यात येते. ही मुलगी किम जाँग ऊन याची राजकीय वारसदार होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा रंगली आहे.
आंतरखंडीय क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाने केलेली चाचणी पाहण्यासाठी किम जाँग उन याच्यासोबत त्याची मुलगी जू एई उपस्थित राहिली होती. त्यावेळी तिचे जगाला प्रथम दर्शन झाले होते. त्यानंतर ती आता पुन्हा एका व्हिडीओत दिसली आहे. शास्त्रज्ञांच्या गटाबरोबर उन व त्याच्या मुलीचे फोटो काढण्यात आले. उन याची सर्वात लाडकी मुलगी आहे. किम जाँग उन याला तीन अपत्येे आहेत. त्याच्या मुलाचा जन्म २०१०मध्ये झाला. त्यानंतरच्या दोन मुलीपैकी एका मुलीचा जन्म २०१३ साली व दुसऱ्या मुलीचा जन्म २०१७ साली झाला होता.