चीनने कोरोना महामारी पसरण्याआधीच तयार केली होती वॅक्सीन? भारतीय तज्ज्ञांचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 12:10 PM2021-06-09T12:10:03+5:302021-06-09T12:14:20+5:30

असा दावा केला जात आहे की, वॅक्सीन आधीच उपलब्ध असल्याने चीनला कोरोना व्हायरस लगेच कंट्रोल करण्यास मदत मिळाली.

Did China ready with vaccine even before pandemic says Indian virologist | चीनने कोरोना महामारी पसरण्याआधीच तयार केली होती वॅक्सीन? भारतीय तज्ज्ञांचा दावा...

चीनने कोरोना महामारी पसरण्याआधीच तयार केली होती वॅक्सीन? भारतीय तज्ज्ञांचा दावा...

Next

चीनच्या (China) वुहान लॅबमध्ये (Wuhan Lab) SARC-COV-2 म्हणजेच कोरोना व्हायरस तयार केल्याची थेअरी मजबूत होताना दिसत आहे. या व्हायरसमुळे जगभरात महामारी पसरली. ज्यामुळे जगभरातील ३७.५४ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगभरात १७.४४ कोटी लोक या व्हायरसने संक्रमित झाले. अशात प्रसिद्ध भारतीय वायरॉलॉजिस्टने दावा केला आहे की, शक्यता आहे की, चीनने व्हायरस पसरण्याचा अंदाज बघता आधीच वॅक्सीन (China Corona vaccine) विकसित केली होती. दावा केला जात आहे की, लाखो लोकांचा जीव घेणारा व्हायरस चीनच्या एका लॅबमध्ये तयार करण्यात आला होता.

असा दावा केला जात आहे की, वॅक्सीन आधीच उपलब्ध असल्याने चीनला कोरोना व्हायरस लगेच कंट्रोल करण्यास मदत मिळाली. आणि १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात डिसेंबर २०१९ मध्ये केवळ ९१,३०० संक्रमणाच्या केसेस नोंदवल्या गेल्या. तसेच ४६३६ लोकांचा जीव गेला. केसेसमध्ये चीन जगभरातील ९८ व्या स्थानावर आहे. वायरॉलॉजिस्ट डॉक्टर टी जॅकब जॉन ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज वेल्लोरमध्ये क्लिनिकल वायरॉलॉजी विभागाचे प्रमुख होते. ते म्हणाले की, वुहान इन्स्टि्टूयट ऑफ वायरॉलॉजीमधून संशयास्पद व्हायरस लीक झाल्याचे काही रहस्य आहेत. (हे पण वाचा : अमेरिका आणि इतर देशांना चीननं नुकसान भरपाई द्यावी, चीनी वस्तूंवर १०० टक्के कर लादा: डोनाल्ड ट्रम्प)

दाव्यात सांगितलं उदाहरण

चीन कोविड महामारी दरम्यान एका अनोख्या देशाप्रमाणे समोर आला. चीनने यासाठी आधीच तयारी केली होती. जे समोर दिसतंय ते तसं नाहीये. त्यांनी एका चीनी तरूणी वैज्ञानिकाच्या SARS-CoV-2 वॅक्सीनसाठी लायसन्ससाठी २४ फेब्रुवारी २०२० ला करण्यात आलेल्या अर्जाचं उदाहरण दिलं. केवळ २ महिन्यात वॅक्सीनवर काम करणं फारच घाईचं वाटतं. त्यांनी वॅक्सीनसाठी कमीत कमी एक वर्षाआधी काम सुरू केलं असेल. (हे पण वाचा : China: आता ३ वर्षांच्या मुलांचंही होणार कोरोना लसीकरण, चीननं दिली मंजुरी; ठरला जगातील पहिला देश)

काहीतरी लपवत आहे चीन

वॅक्सीनसाठी अर्ज करणाऱ्या तरूण वैज्ञानिकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याबाबत अनेक रहस्य आहेत. असं वाटतं चीन गुन्हेगारांसारखा काहीतरी लपवत आहे. आश्चर्यकारकपणे कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायंसेस, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) दिल्लीच्या भारतीय जैवविज्ञानीने कथितपणे SARS-CoV-2 व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये चार जीन एकत्र आल्याची माहिती मिळवली होती. स्पाइक प्रोटीन व्हायरसचं मानवी सेलमध्ये प्रवेश करण्याचं एक हत्यार आहे. हा २०२० चा सुरूवातीचा रिसर्च होता. जो रिव्ह्यू केला गेला नाही आणि फेब्रुवारीमध्ये मागे घेण्यात आला.

अशात आता अमेरिकन सरकारच्या लॉरेन्स लिवरमोर नॅशनल लेबॉरेटरी, कॅलिफोर्नियाच्या एका रिपोर्टवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. ज्यात मे २०२० मध्ये एक रिसर्च करण्यात आला होता. ज्यात सांगण्यात आलं होतं की, वुहानच्या प्रयोगशाळेतून व्हायरस लीक करण्याची परिकल्पना प्रशंसनीय होती आणि याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे.
 

Web Title: Did China ready with vaccine even before pandemic says Indian virologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.