खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:31 IST2025-04-21T19:30:29+5:302025-04-21T19:31:08+5:30
नॉस्ट्रॅडॅमस यांनी १५५५ मध्ये लिहिलेल्या "लेस प्रोफेसीज" नावाच्या पुस्तकात कवितांच्या सहाय्याने अनेक प्रमुख घटनांसंदर्भात भाकीते वर्तवली आहेत.

खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
फ्रेंच अॅस्ट्रोलॉजर नॉस्ट्रॅडॅमसची यांनी वर्तवलेली भाकीतं आजही लोकांना आश्चर्य चकित करतात. नॉस्ट्रॅडॅमस यांनी १५५५ मध्ये लिहिलेल्या "लेस प्रोफेसीज" नावाच्या पुस्तकात कवितांच्या सहाय्याने अनेक प्रमुख घटनांसंदर्भात भाकीते वर्तवली आहेत. यात, लंडनची आग, हिटलरचा उदय, अमेरिकेत झालेला ११ सप्टेंबरचा हल्ला आणि कोविड-१९ महामारीचा समावेश होतो. यातच आता, नॉस्टॅडॅमस यांनी त्यांच्या पुस्तकात पोप फ्रान्सिस यांचा मृत्यूसंदर्भात आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातही भविष्यवाणी केल्याची चर्चा सुरू आहे.
पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू -
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आज सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर न्यूमोनिया आणि अॅनिमियाचा उपचार सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे ते सुमारे ५ आठवडे रुग्णालयात दाखल होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर, आता नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. यात, एका जुन्या पोंटिफ (चर्च प्रमुख) च्या मृत्यूचा आणि नवीन नेत्याच्या आगमनाचा उल्लेख करण्यात आला आहे.
नॉस्ट्रॅडॅमसनं केली होती अशी भविष्यवाणी -
"एका अत्यंत वृद्ध पोपच्या मृत्यूनंतर, एक कमी वयाचा रोमन (पदासाठी) निवडला जाईल. लोक म्हणतील की, तो आपली गादी कमकुवत करत आहे. मात्र तो अविरतपणे पुढे जात राहील," असे नॉस्ट्रॅडॅमसने एक भविष्यवाणीत म्हटले आहे.
नॉस्ट्रॅडॅमस पुढे म्हणाला, "पवित्र रोमन चर्चच्या अखेरच्या छळादरम्यान एक रोमन पीटर गादीवर येईल. तो अनेक संघर्षांमध्ये आपल्या लोकांना सहभागी करेल आणि जेव्हा हे सर्व संपुष्टात येईल, तेव्हा सात टेकड्यांचे शहर नष्ट होईल आणि भयंकर न्यायाधीश आपल्या लोकांचा न्याय करतील."