तुर्कीच्या संसदेजवळ स्वत:ला उडवणाऱ्या हल्लेखोराचा VIDEO बघितला? पाहून थरकाप उडेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 07:10 PM2023-10-01T19:10:08+5:302023-10-01T19:11:15+5:30
अंकारा येथील संसदेजवळ रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या हल्ल्यात एक फिदाईन मारला गेला, तर दुसऱ्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या स्फोटात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
तुर्कस्तानची राजधानी असलेल्या अंकारा येथे रविवारी एक थरकाप उडवणारी घटना घडली. येथे एका आत्मघातकी हल्लेखोराने संसदेजवळच स्वत:ला उडवले. या भीषण स्फोटानंतर अंकारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्मघातकी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून कुणाच्याही अंगावर शहारा एईल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अंकारा येथील संसदेजवळ रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या हल्ल्यात एक फिदाईन मारला गेला, तर दुसऱ्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या स्फोटात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय? -
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक कार वेगाने गृह मंत्रालयाच्या सुरक्षा महासंचालनालयाजवळ येते आणि प्रवेशद्वारासमोर थांबते. ही कार थांबताच, एक दहशतवादी कारमधून बाहेर येतो आणि राष्ट्रीय पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या गेटजवळ पोहोचतो आणि स्वत:ला उडवून देतो.
NEW: Ankara attack footage from this morning. #Turkeypic.twitter.com/CshYPAB64H
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 1, 2023
माध्यमांतील वृत्तांनुसार, हा स्फोट एवढा भयंकर होता की, याचा आवाड काही किमीपर्यंत ऐकू गेला. या स्फोटानंतर परिसरात प्रचंड धूर निर्माण झाल्याचेही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, आज राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांच्या अभिभाषणाने संसदेचे कामकाज सुरु होणार होते. टीव्ही चॅनल एनटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला असून परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. या घटनेनंतर आपत्कालीन सेवाही घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच, हल्ल्यानंतर संसद भवन आणि गृह मंत्रालयाच्या इमारतीभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.