डायनासोरचे ११ कोटी वर्षांपूर्वीचे पायाचे ठसे; संशोधकांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:56 AM2021-06-21T06:56:10+5:302021-06-21T06:56:55+5:30
पायाचे हे ठसे केंटच्या फोकस्टोनमध्ये किनारी भागात सापडले आहेत.
Next
लंडन : ब्रिटनच्या केंटमध्ये ११ कोटी वर्षांपूर्वीचे किमान सहा जातींच्या डायनासोरचे पायाचे ठसे सापडले आहेत. संशोधकांनी एका अहवालात याबाबतचा दावा केला आहे.
पायाचे हे ठसे केंटच्या फोकस्टोनमध्ये किनारी भागात सापडले आहेत. विद्यापीठाचे प्रोफेसर डेव्हिड मार्टिल म्हणाले की, हा अतिशय महत्वाचा शोध आहे. त्या काळात डायनासोर या भागातून गेले असावेत. याबाबतचा अहवाल प्रोसिडिंग्स ऑफ द जियॉलॉजिस्ट असोसिएशनच्या अंकात प्रकाशित झाला आहे.