चीनच्या राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांमध्ये विसंवाद; चीनमध्ये सारे आलबेल नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 03:31 AM2020-06-30T03:31:48+5:302020-06-30T03:32:06+5:30

भारत-चीनमध्ये गलवान खोºयातील झटापटीनंतर लष्करी स्तरावरील चर्चेस आजपासून सुरूवात होणार आहे. एकाचवेळी लष्करी व राजनैतिक अधिकारी चर्चा करून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे

Disagreement between Chinese president and prime minister; Not all albels in China! | चीनच्या राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांमध्ये विसंवाद; चीनमध्ये सारे आलबेल नाही!

चीनच्या राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांमध्ये विसंवाद; चीनमध्ये सारे आलबेल नाही!

Next

टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असताना भारत, जपानसारख्या बलाढ्य देशांसमवेत सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनच्या कृतीचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. हाँगकाँगमधील दडपशाहीसोबतच पंतप्रधान लि कचांग व राष्ट्रपती शी जिनिपिंग यांच्यातील मतभेदही उफाळून येत आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाने २०२१ पर्यंत चीनमधून गरिबीचे उच्चाटन करण्याची घोषणा दशकभरापूर्वी केली. केवळ दीड वर्षांचा अवधी राहिला असला तरी कोट्यवधी चिनी नागरिकांचे उत्पन्न १ हजार युआनपेक्षा जास्त नसल्याचे वक्तव्य पंतप्रधानांनी केले. गरिबी हटावचा जिनिपिंग यांचा नारा त्यामुळे फोल ठरल्याचे अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी सूचित केले. चिनी माध्यमांमध्ये याचे फारसे वृत्तांकन आले नसल्याचे परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचे म्हणे आहे. चिनी भाषा येत असल्याने सोशल मीडियावरील ही चर्चा या अधिकाºयांच्या नजरेस पडली.

कोरोना प्रसाराचे केंद्र ठरलेल्या वुहान शहरावरच सारा दोष चिनी राज्यकर्त्यांनी टाकला. मात्र आम्ही पूर्वसूचना केंद्र सरकारला दिली होती, त्यांनी दुर्लक्ष केल्याचे वृत्त राज्य सरकारच्या अखत्यारित असणाºया वुहानमधील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. त्याचा प्रतिवाद पीपल्स डेली वृत्तपत्रात केंद्र सरकारमधील अधिकाºयांनी केला होता, याकडे या अधिकाºयाने लक्ष वेधले. पाश्चिमात्य वृत्तपत्रांमधील अहवालानुसार चीनमध्ये प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न सरासरी १० टक्क्यांनी घटले आहे.

आजपासून लष्करी अधिकाºयांत चर्चा
नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये गलवान खोºयातील झटापटीनंतर लष्करी स्तरावरील चर्चेस आजपासून सुरूवात होणार आहे. एकाचवेळी लष्करी व राजनैतिक अधिकारी चर्चा करून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. गलवान खोºयावर दावा सांगण्याचा कांगावा सुरूच असून चीनने आपल्या हद्दीत पाय पसरण्यास सुरूवात केली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पँगाँग सरोवराच्या परिसरात चीनने मोठे बांधकाम केले. सैनिकांना लपण्यासाठी खंदक खणले. बंकरही तयार केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत तीन वेळा चीनचे नाव घेता सूचक इशारा देत युद्धसज्जतेची ग्वाही देशवासीयांना दिली. आशिया खंडात चीनच्या लष्करी सामार्थ्यास भारताने आव्हान दिल्याचा संदेश त्यातून जगभर गेला. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये पाच वेळा लष्करी स्तरावर चर्चा झाली. चीनने स्वत:च्या हद्दीतून अजून मागे जाण्यास सहमती दर्शवली होती. प्रत्यक्षात तसे झालेच नाही. चिनी मनसुबा त्यामुळे भारताने हेरला व अत्याधुनिक हत्यारसज्ज जवानांची तुकडी लडाख सीमेवर तैनात केली.

अद्याप चीनकडून 'धाडसी' निर्णय घेण्याचे संकेत मिळत नसले तरी पूर्वानुभव म्हणून दगाफटका झाल्यास परतवण्यास भारत सज्ज असल्याचे परराष्ट्र मंत्रायातील अधिकाºयांनी सांगितले. चीनला लष्करी सामार्थ्यासह आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतून धडा शिकवला जाईल, असेही परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. भारत व जपानमध्ये युद्धनौका सराव सुरू झाल्याने चीनला योग्य तो संदेश गेला. फ्रान्स, रशियाने अत्याधुनिक उपकरणे, लढाऊ विमाने, लष्करी गुप्तहेर यंत्रणा (इंटेलिजंस) तंत्रज्ञान देण्यास सहमती दर्शवली.

Web Title: Disagreement between Chinese president and prime minister; Not all albels in China!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.