सूर्यापेक्षा ७० पट आकाराच्या कृष्णविवराचा लागला शोध, एलबी-१ असे नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 05:00 AM2019-11-29T05:00:36+5:302019-11-29T05:01:04+5:30
आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा ७० पट महाप्रचंड अशा ‘राक्षसी’ कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला
बीजिंग : आमच्या आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा ७० पट महाप्रचंड अशा ‘राक्षसी’ कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला असून तारे, ग्रह कसे उत्क्रांत झाले याबद्दल जे सांगितले जाते त्या सिद्धांतालाच आव्हान मिळत आहे, असे शास्त्रज्ञांनी गुरुवारी म्हटले.
आकाशगंगेत अंदाजे १०० दशलक्ष ताऱ्यांसारखे दिसणारे ब्लॅक होल्स (महाप्रचंड ग्रह/तारे कोसळून जे अस्तित्वात आले ते म्हणजे ब्लॅक होल्स) आहेत. ही कृष्ण विवरे इतकी घट्ट आहेत की, त्यातून सूर्यप्रकाशही पलीकडे जाऊ शकत. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की, आमच्या आकाशगंगेतील स्वतंत्र असे एकेक कृष्णविवर हे सूर्याच्या २० पटीपेक्षा जास्त नाही, असे संशोधकांनी म्हटले. या नव्या शोधामुळे आतापर्यंतचा समज भुईसपाट झाला.
आंतरराष्ट्रीय तुकडीला फार मोठ्या कृष्णविवराचा शोध लागला. तिचे नेतृत्व नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल आॅब्झर्वेटरी आॅफ चायनाने (एनएओसी) केले होते. हे संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाले. त्यात कृष्ण विवराचे नामकरण एलबी-१ असे केले गेले असून, ते पृथ्वीपासून १५ हजार प्रकाशवर्षे दूर आहे.
ग्रह-ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे जे बहुतेक सिद्धांत आहेत त्यांचा विचार केला तर कृष्णविवरांचा हा समूह आमच्या आकाशगंगेत अस्तित्वात असायलाच नको, असे एनएओसीचे प्रोफेसर लिऊ जिफेंग यांनी
म्हटले. (वृत्तसंस्था)
अंदाजापेक्षा दुप्पट आकार
आम्हाला असे वाटले की, आमच्या आकाशगंगेसारखी रासायनिक रचना असलेले प्रत्येक महाप्रचंड तारे त्यांचे आयुष्य संपण्याकडे जातात तसे शक्तिशाली ग्रहाच्या वाºयांत त्यांचा वायू सोडून देतच असले पाहिजे. त्यामुळे त्यांनी असे प्रचंड स्वरूपातील अवशेष मागे सोडून द्यायला नको.
एलबी-१ चा आकार आम्हाला जेवढा वाटला होता त्याच्या दुप्पट आहे. आता सिद्धांतवादींना ते कसे तयार झाले याचे आव्हान स्वीकारावे लागेल, असे लिवू म्हणाले.