पृथ्वीच्या सर्वांत जवळच्या ब्लॅक हाेलचा शाेध; सूर्यापेक्षा १० पट माेठे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 07:34 AM2022-11-06T07:34:15+5:302022-11-06T07:35:24+5:30
ब्रह्मांडामध्ये असलेल्या ‘ब्लॅक हाेल’ अर्थात कृष्णविवर या प्रकाराबाबत प्रचंड कुतूहल आहे. त्यांना खरेतर खलनायक समजले जाते.
न्यूयाॅर्क :
ब्रह्मांडामध्ये असलेल्या ‘ब्लॅक हाेल’ अर्थात कृष्णविवर या प्रकाराबाबत प्रचंड कुतूहल आहे. त्यांना खरेतर खलनायक समजले जाते. अशाच एका खलनायकाचा खगाेलशास्त्रज्ञांनी शाेध लावला आहे. ज्ञात असलेले पृथ्वीपासून सर्वांत जवळचे ब्लॅक हाेल असल्याचे खगाेलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, ते आपल्या ‘मिल्की वे’ आकाशगंगेतील निष्क्रिय तारकीय वस्तुमान असलेले पहिलेच ब्लॅक हाेल आहे. राॅयल ॲस्ट्राॅनाॅमिकल साेसायटीच्या मासिकात याबाबत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. नुकताच पृथ्वीपासून सर्वांत जवळ असलेल्या कृष्णविवराचा शाेध लागला आहे. (वृत्तसंस्था)
टेलिस्काेपचा वापर
1. शास्त्रज्ञांनी हवाई येथील जेमिनी नाॅर्थ या टेलिस्काेपचा वापर केला. त्यातून या कृष्णविवराच्या हालचाली टिपल्या आहेत.
2. पृथ्वी जशी सूर्याभाेवती फिरते, त्याचप्रमाणे सूर्यासारखाच एक तारा कृष्णविवराभाेवती फिरत आहे. तसेच त्याचे अंतरही सूर्य आणि पृथ्वीएवढेच आहे. म्हणजेच, आपल्या सूर्यमंडळासारखे हे ब्लॅक हाेल आहे.
- नवे कृष्णविवर सूर्यापेक्षा १० पट अधिक माेठे आहे. महत्त्वाचे म्हणजे ते सुमारे १ हजार ६०० प्रकाशवर्ष अंतरावर भुजंगधारी व ओफियुकस नक्षत्रात आहे.
- आतापर्यंत माहिती असलेल्या कृष्णविवरांपेक्षा ते तीन पट अधिक जवळ आहे.
एखादा जुना तारा नष्ट झाल्यामुळे हे कृष्णविवर निर्माण झाले असून, या ताऱ्याचे आयुष्यमानही काही दशलक्ष वर्षेच असावे, असा खगाेलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
५ ते १०० पट सूर्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेली अनेक कृष्णविवरे आहेत.
१ अब्ज अशी कृष्णविवरे एकट्या मिल्की वेमध्येच आहेत.
आतापर्यंत अशा प्रकारच्या कृष्णविवरांचे दावे यापूर्वी करण्यात आले हाेते. ते फेटाळण्यात आले हाेते. मात्र, शास्त्रीय पुराव्यासह हा पहिलाच शाेध आहे.
- करीम एल. बादरी, प्रमुख संशाेधक