भारत दौ-यात भोपाळ गॅसवर चर्चा करा

By admin | Published: January 15, 2015 06:16 AM2015-01-15T06:16:10+5:302015-01-15T06:16:10+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौ-यावर येत असून, या दौ-यात त्यांनी १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील बळींच्या संदर्भात

Discuss Bhopal gas in India | भारत दौ-यात भोपाळ गॅसवर चर्चा करा

भारत दौ-यात भोपाळ गॅसवर चर्चा करा

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौ-यावर येत असून, या दौ-यात त्यांनी १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील बळींच्या संदर्भात भारत सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती आघाडीच्या जागतिक हक्क संघटनेने केली आहे.
बराक ओबामा भारतातील २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होणा-या चर्चेत भोपाळ वायुकांडाचा मुद्दा जरूर उपस्थित करा. यासंदर्भात या दोन नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले.
भोपाळ येथील कारखान्याची जागा, आरोग्याला बाधक ठरणारा तेथील कचरा स्वच्छ होईल व या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, असे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अमेरिकेतील प्रमुख मार्गारेट हांग यांनी ओबामा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Discuss Bhopal gas in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.