Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 01:47 PM2020-06-06T13:47:53+5:302020-06-06T13:50:57+5:30
एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही, पण सोशल मीडियावर मेसेज आणि मीम्सचा पाऊस पडतोय.
इस्लामाबाद - 1993च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेमागचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्यापाकिस्तानात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू आहे. एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही, पण सोशल मीडियावर मेसेज आणि मीम्सचा पाऊस पडतोय.
शुक्रवारी गुप्तचर यंत्रणांमार्फत दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन यांना कोरोना झाल्याची माहिती काल मिळाली होती. दाऊद आणि त्याची पत्नी यांना कराचीच्या मिलिटरी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं समजलं होतं. तसंच दाऊदचे खासगी कर्मचारी आणि रक्षकांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आज दाऊदच्या मृत्यूची चर्चांना उधाण आलं आहे.
Bill gates works on a vaccine for a disease only if Dawood Ibrahim has died of it. https://t.co/92S0yrvrLz
— Gabbbar (@GabbbarSingh) June 6, 2020
अनीस म्हणाला- दाऊद स्वस्थ आहे
दाऊद इब्राहिमला कोरोना संक्रमित झाल्याच्या वृत्तास त्याचा भाऊ अनीस इब्राहिम यांनी नाकारले आहे. अनीस यांनी असा दावा केला की, त्याच्या भावासोबत कुटुंबातील सर्व सदस्य स्वस्थ आहेत आणि कोणालाही रुग्णालयात दाखल केले नाही. अनीस इब्राहिम दाऊदची डी-कंपनी चालविते.
अनीस दाऊदचा व्यवसाय चालवितो
वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम यांनी अज्ञातस्थळावरून फोनवरून सांगितले की, दाऊदच्या कुटुंबातील सर्व सदस्य ठीक आहेत. त्याच्या कुटुंबातील कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. अनीस युएईच्या लक्झरी हॉटेल आणि पाकिस्तानमधील मोठ्या बांधकाम प्रकल्प व्यतिरिक्त वाहतुकीचा व्यवसाय देखील चालवित आहे.
१९९३ बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार होता. या दहशतवादी घटनेत 13 बॉम्बस्फोट झाले होते ज्यात 350 लोक मरण पावले आणि 1200 हून अधिक लोक जखमी झाले. 2003 मध्ये भारत सरकारने अमेरिकेशी मिळून दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले.
पाकिस्तानी सैन्याने आश्रय दिला
भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या भीतीने त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. कराची येथे पाकिस्तान लष्कर आणि आयएसआय त्याच्या संरक्षणाखाली तैनात आहेत. भारताने अनेक वेळा पुरावे सादर केल्यानंतरही पाकिस्तानने नेहमीच येथे दाऊद असल्याचे नाकारले आहे.
And everytime Dawood be like... pic.twitter.com/4vY5gkPz3J
— Megh ⚽ (@pogshoot) June 6, 2020
After news of Dawood ibrahim dies due to corona..
— Hulk 🚩 (@Memeaddicted__) June 6, 2020
Le Bollywood Bhand -- pic.twitter.com/5QRWr1tOEi
Badhai ho, dawood ek baar fir mar gaya !!
— Nishu 🍇 (@The_NisHIT) June 6, 2020
😂😂😂😂😂😂😂😂#DawoodIbrahim#CoronaVirushttps://t.co/IydK81Kj6v
Who did this? 😂#DawoodIbrahimpic.twitter.com/fQ0UhP8g3J
— PM Sai Prasad🇮🇳 (@team_sai) June 5, 2020
निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल