मुंबई हल्ल्यासह मोदी सरकारवर चर्चा जमात-उद-दावाचा दावा

By admin | Published: July 18, 2014 01:33 AM2014-07-18T01:33:27+5:302014-07-18T01:33:27+5:30

भारतीय पत्रकार आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्यातील भेटीवरून वादंग

Discussion on Modi government with Mumbai attacks, Jamaat-ud-Dawa claim | मुंबई हल्ल्यासह मोदी सरकारवर चर्चा जमात-उद-दावाचा दावा

मुंबई हल्ल्यासह मोदी सरकारवर चर्चा जमात-उद-दावाचा दावा

Next

लाहोर : भारतीय पत्रकार आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्यातील भेटीवरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जमात-उद-दावाने गुरुवारी एक निवेदन जारी करून या दोघांमध्ये मुंबई हल्ल्यासह नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यशैलीवरही चर्चा झाल्याचा दावा केला आहे.
जमात-उद-दावा ही सईदची संघटना आहे. सईद व भारतीय पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांच्यातील भेटीदरम्यान उपस्थित असल्याचा दावा करणारा जमात-उद-दावाचा प्रवक्ता याह्या मुजाहिद याने वैदिक यांच्या विनंतीवरूनच ही भेट झाल्याचे सांगितले.
सईद यांना अनेक विदेशी पत्रकार भेटतात, असेही तो म्हणाला.

Web Title: Discussion on Modi government with Mumbai attacks, Jamaat-ud-Dawa claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.