'सीमावाद पे चर्चा', अखेर चीन अन् भारताच्या संरक्षणमंत्र्यांची भेट झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:17 PM2020-09-05T16:17:47+5:302020-09-05T16:20:21+5:30
पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता.
मास्को : भारत-चीन (India-China Tension) मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (SCO) चीनचे संरक्षण मंत्री वेई फ़ेंघे यांनी भेट घेतली. या भेटीत भारत आणि चीनमधील सीमा वादावर तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. त्यामध्ये, भारतीय सैन्य जबाबदारीने वागत असून सीमा भागात शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राजनाथसिंह यांनी फेंघे यांना सांगितले.
पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी पाठविले होते. त्याच पार्श्वभूमीवर रशियात चीनच्या संरक्षणमंत्र्यांना न भेटण्याच भारताने ठरवलं होतं. मात्र, अखेर दोन्ही देशांतील वाढता तणाव लक्षात घेता, चीन व भारताच्या संरक्षणमंत्र्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान, देशाची अखंडता आणि सीमा सांभाळण्यास भारत सक्षम आहे, कुणीही भारताच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करु नये. लडाख सीमारेषेवर चीन सैन्याची आक्रमकता आणि हालचाली या दोन्ही देशांत झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. मात्र, दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी सीमा भागात शांती प्रस्थापित करण्यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांतील परस्पर संबंध सौहार्दपूर्ण करण्यासाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे, कुठल्याही मतभेदाचे रुपांतर वादात होता कामा नये, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
Raksha Mantri Shri @rajnathsingh meeting the Chinese Defence Minister, General Fenghe in Moscow. pic.twitter.com/BDXFAYAVjn
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 4, 2020
चीनचे वृत्तपत्र असलेल्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने चीनच्या सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआच्या वृत्तानुसार बातमी दिली आहे. त्यानुसार, गेल्या महिन्यात सीमा रेषेवर झालेल्या तणावास चीनने भारतालाच जबाबदार ठरवले आहे. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी भारतीय संरक्षण मंत्र्यांकडे तणाव कमी करण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची ही चर्चा तब्बल 2 तास चालली. त्यामध्ये, सीमारेषेवरील तणावाची संपूर्ण जबाबदारी भारताची आहे, असे फेंघे यांनी म्हटलंय.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एससीओच्या बैठकीत सहभाग झाले. त्यासाठी ते बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. जेव्हा संघटनेचे दोन मोठे देश सीमेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, तेव्हाच ही बैठक झाली. त्यामुळे जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार सप्टेंबरला एससीओतील संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये शस्त्रास्त्रे खरेदी आणि सहकार्यावर चर्चा करण्यात आली. तसेच मोठी डीलही करण्यात आली आहे.