माणुसकीला काळीमा! पोलिसांनी महिलेला बाईकला बांधून फरफटत नेले; केनियातील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:38 PM2020-06-12T13:38:29+5:302020-06-12T13:40:34+5:30

केनियाची राजधानी नैरोबीमध्ये हा धक्कादाय़क प्रकार समोर आला आहे.

Disgrace to humanity! woman was tied to the bike and taken for a ride; Kenya | माणुसकीला काळीमा! पोलिसांनी महिलेला बाईकला बांधून फरफटत नेले; केनियातील कृत्य

माणुसकीला काळीमा! पोलिसांनी महिलेला बाईकला बांधून फरफटत नेले; केनियातील कृत्य

Next

नैरोबी: माणसाला घोडा, कार किंवा बाईकच्या मागे बांधून जमीनीवर घासत नेण्याची दृष्ये आपण सिनेमांमध्ये पाहिली आहेत. हे सहसा व्हिलन करत होते. मात्र, पोलिसांनीच असे कृत्य एका महिलेसोबत केले आहे. ही अमानुष घटना केनियातील आहे. 


केनियाची राजधानी नैरोबीमध्ये हा धक्कादाय़क प्रकार समोर आला आहे. नैरोबीच्या कुरेसोई मध्ये ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. केनियाच्या पोलिसांनी एका महिलेला बाईकच्या मागे बांधले आणि फरफटत नेले. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनविला आणि सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. यानंतर लोकांनी टाका करायला सुरुवात केली. 

प्रकरण इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर प्रशासनाने गंभीरतेने घेतले आणि तीन पोलिसांना अटक केली आहे. डीसीआय केनियाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 11 जूनला हे ट्विट केले आहे. त्यांनी सांगितले की, कुरेसोईच्या दक्षिण भागात एका महिलेला बाईकला बांधून फरफटत नेण्यात आले. या चा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दुसऱ्या दिवशी तीन पोलिसांना अटक करण्य़ात आली आहे. पुढील तपास सुरु असून त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले आहे. 



हा व्हिडीओ दीड मिनिटांचा आहे. यामध्ये एक अधिकारी बाईक चालविताना दिसत आहे. त्याच्या बाईकला एक 21 वर्षीय महिला रस्सीने बांधलेली दिसत आहे. तिला फरफटत नेतानाचा हा व्हिडीओ आहे. तर अन्य पोलीस तिला मारहाण करत आहेत. 



 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बापरे...! चीनच्या मानवरहीत पाणबुडीने जे केले, ते पाहून जगाचे डोळे विस्फारले

CoronaVirus धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

आजचे राशीभविष्य - 12 जून 2020

 

Web Title: Disgrace to humanity! woman was tied to the bike and taken for a ride; Kenya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.