विचित्रपणाचा कळस! मॉलमध्ये खाण्याच्या वस्तूंवर थुंकत होती महिला; सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:57 PM2021-12-07T16:57:15+5:302021-12-07T16:58:25+5:30
तिच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एक अमेरिकन महिलेला मॉलमध्ये (Woman In Shopping Mall) विचित्रपणा करताना पाहून लोक सोशल मिडियावरून संताप व्यक्त करत आहेत. खरेदीसाठी मॉलमध्ये गेलेल्या एका महिलेने तेथील अनेक वस्तू उष्ट्या करून करून पुन्हा ठेवल्या. तिच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना दक्षिण अमेरिकेतील Nashville येथील आहे. येथे एका मॉलमध्ये गेलेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही महिला मॉलमध्ये चिप्सचे पॅकेट फोडून त्याची चव बघताना आणि नंतर त्याच पॅकेटमध्ये थुंकून ते सीलबंद करून ठेवताना दिसत आहे.
मॉलमधील खाण्या-पिण्याच्या वस्तू करतेय खराब!
या महिलेने पाण्याच्या बाटलीबरोबरही असेच केले. तिने पाण्याची बाटली उचलली, तोंड लावून पाणी प्यायले आणि बाटली परत ठेवून दिली. या महिलेची ओळख पटली असून ती मेकअप आर्टिस्ट लिब्बी बार्न्स (Libby Barnes) असल्याचे समजते. बार्न्सने सोडा आणि कँडीसोबतही असेच कृत्य केल्याचे बोलले जात आहे. मात्र, तिचा हा व्हिडिओ कुणी तयार केला, हे स्पष्ट झालेले नाही. पण असे दिसून येते, की लिब्बी बार्न्सला स्वतःचा व्हिडिओ होत असल्याची चिंता नव्हती. कारण ती अनेक वेळा कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहे. यावेळी जेव्हा एक व्यक्ती तिच्याकडे येते आणि विचारते की, 'तू चोरी करत आहेस?'
यावर उत्तर देताना लिब्बी म्हणते, 'मी चोरी करत नाहीये. मी या वस्तू (उष्ट्या केलेल्या वस्तू) खरेदी करणार आहे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या." वृत्तानुसार, बार्न्सने स्टोअर सोडण्यापूर्वी त्या वस्तूंसाठी पैसेही दिल्याचे समजते.
'Disgusting' woman is blasted for SPITTING into bags of chips in a grocery store https://t.co/W5YwdStCVp
— Daily Mail Online (@MailOnline) December 6, 2021
पण, या घटनेचा व्हिडिओ समोर येताच एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी महिलेच्या अटकेची मागणी सुरू केली. यासंदर्भात, स्टोअरने स्पष्टिकरण देताना म्हटले आहे, की संबंधित महिलेने त्या वस्तू स्वत:च खरेदी केल्या होत्या आणि त्यासाठी पैसेही दिले होते. याशिवाय, स्टोअरने ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे आणि चौकशीचे आदेशही दिले आहेत.