बेदरकार वाहनचालकांना दुबईत रस्ते साफ करण्याची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 11:50 AM2017-02-25T11:50:07+5:302017-02-25T11:50:07+5:30
दुबईच्या रस्त्यावर एका पावसाळया रात्री एक एसयूव्ही वाहनचालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
ऑनलाइन लोकमत
शारजा, दि. 25 - काही आठवडयांपूर्वी दुबईच्या रस्त्यावर एका पावसाळया रात्री एक एसयूव्ही वाहनचालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कोणाचीही पर्वा न करता गाडी वेगात पुढे-मागे करण्याच्या त्याच्या खेळामुळे आसपास उभे असलेल्या लोकांना जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळी आडोसा घ्यावा लागला होता.
या एसयूव्ही चालकाची ओळख पटली असून, दुबईचे शासक एच.एच शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी कारचालक आणि त्याच्यासोबत कारमध्ये बसलेल्यांना दुबईचे रस्ते साफ करण्याची शिक्षा सुनावली आहे. पुढचे 30 दिवस त्यांना दररोज चार तास हातात झाडू घेऊन दुबई स्वच्छ करावी लागणार आहे.
रस्त्यावर लहान मुले, कुटुंब आणि वाहतुकीची वर्दळ सुरु असताना एसयूव्हीचालक बेदरकार गाडी चालवत होता असे दुबई मीडिया ऑफीसमधून सांगण्यात आले. अलमुस्तकबाल रस्त्यावर ही घटना घडली.
. @HHShkMohd orders drivers who performed dangerous car stunt to clean #Dubai streets for 4 hours daily for 30 days as community service pic.twitter.com/QXsFoBsbwI
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) February 23, 2017