डिस्लाईक ऑप्शन नावडते -झुकेरबर्ग

By admin | Published: December 14, 2014 01:39 AM2014-12-14T01:39:30+5:302014-12-14T01:39:30+5:30

लाईकसोबत डिस्लाईक ऑप्शनही असावे की नाही, यावर बरीच चर्चा झाली असली तरी ‘फेसबुक’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनाच ‘डिस्लाईक’ ऑप्शन पसंत नाही.

Dislikes option dislikes - Zuckerberg | डिस्लाईक ऑप्शन नावडते -झुकेरबर्ग

डिस्लाईक ऑप्शन नावडते -झुकेरबर्ग

Next
सॅन फ्रान्सिस्को :  सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेले ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचे सर्वाधिक पसंतीचे माध्यम म्हणजे फेसबुक होय. लाईकसोबत डिस्लाईक ऑप्शनही असावे की नाही, यावर बरीच चर्चा झाली असली तरी ‘फेसबुक’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनाच ‘डिस्लाईक’ ऑप्शन पसंत नाही.
उत्तर कॅलिफोर्नियातील फेसबुकच्या मुख्यालयात त्यांनी लोकांशी ऑनलाईन संवाद साधत यावर आपले मत व्यक्त केले. डिस्लाईक ही संकल्पनाच चुकीची असल्याने हा ऑप्शन देण्यात आलेला नाही. एखादी पोस्ट चांगली की वाईट यासाठी मतदान घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
 
 

 

Web Title: Dislikes option dislikes - Zuckerberg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.