२८ हजार कर्मचाऱ्यांना डिस्ने बसविणार घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 02:29 AM2020-10-01T02:29:51+5:302020-10-01T02:30:23+5:30
कंपनीने म्हटले की, आम्ही थिम पार्कमधील कर्मचाºयांची संख्या २८ हजारांनी कमी करीत आहोत. ही संख्या एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत एकचतुर्थांश आहे
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील प्रसिद्ध मनोरंजन कंपनी डिस्ने आपल्या थिम पार्कमधील २८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे डिस्नेने हा निर्णय घेतला आहे. डिस्ने पार्कचे चेअरमन जोश डीआमरो यांनी सांगितले की, हा निर्णय हृदयाला घरे पाडणारा असला तरी कोविड-१९मुळे व्यवसायावर जो दीर्घकालीन परिणाम झाला आहे, त्यामुळे आमच्यासमोर हाच एक व्यवहार्य पर्याय उपलब्ध आहे. कोविड-१९मुळे शारीरिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्याचा परिणाम म्हणून पार्कची क्षमता घटली आहे. साथ किती काळ चालेल हे अनिश्चित असल्यामुळे लगेचच क्षमता वाढण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत कर्मचारी संख्या कमी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय कंपनीसमोर उपलब्ध नाही.
कंपनीने म्हटले की, आम्ही थिम पार्कमधील कर्मचाºयांची संख्या २८ हजारांनी कमी करीत आहोत. ही संख्या एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत एकचतुर्थांश आहे. साथीच्या आधी कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा येथील डिस्ने पार्कमधील कर्मचाºयांची संख्या १,१०,००० होती. रोजगार कपातीनंतर ती ८२ हजार होणार आहे.
डीआमरो यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅलिफोर्निया सरकार बंधने उठवायला तयार नसल्यामुळे या राज्यातील डिस्नेलँड पार्क बंदच आहे. तो कधी उघडेल हे सांगणे अवघड आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी कपातीचा कटु निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे.