व्हिसा नाकारणा:या देशाला व्हिसाची भेट
By admin | Published: October 2, 2014 01:02 AM2014-10-02T01:02:19+5:302014-10-02T01:02:19+5:30
तब्बल एक दशक नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत पाय ठेवूदिला नाही, त्याच नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी नागरिकांना भारत भेटीदरम्यान ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ देण्याची घोषणा केली.
Next
न्यूयॉर्क : ज्या अमेरिकेने व्हिसा नाकारून तब्बल एक दशक नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत पाय ठेवूदिला नाही, त्याच नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी नागरिकांना भारत भेटीदरम्यान ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ देण्याची घोषणा करून या संपूर्ण घटनाक्रमाच्या इतिवृत्ताला नवीन अर्थ दिला.
अमेरिकेने घातलेल्या बंदीचा पंतप्रधान मोदी यांनी थेट उल्लेख केला नाही. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य स्वागत समारंभातील भाषणात ते म्हणाले की, कोणत्याही भारतीय व्यक्तीला आजवर एवढे प्रेम दिले नसेल, त्यापेक्षाही अधिक प्रेम तुम्ही मला दिले. या समारंरभाला अमेरिकचे 4क् खासदारही आवजरुन उपस्थित होते. न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलात उतरल्यापासून न्यूयॉर्कवासियांत मोदी यांच्या स्वागतासाठी चुरस लागली होती.
मॅडीसन स्क्वेअर गार्डनचे वार्षिक उत्पन्न 88 हजार अमेरिकन डॉलर आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेले भारतीय-अमेरिकन आर्थिकदृष्टय़ा मूळ अमेरिकन किवा ज्यु अमेरिकन नागरिकांपेक्षाही समृद्ध आहेत. मास्टरकार्डचे प्रमुखही एक भारतीय आहेत. त्यांनी अमेरिकी नागरिकांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ आणि पीआयओ कार्डधारकांसाठी आजीवन व्हिसा देण्याची घोषणा करून त्यांची मने जिंकली. (वृत्तसंस्था)