भारताला नडले, जनतेने जागा दाखवली; मुइज्जू यांचा पक्ष स्थानिक निवडणुकीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 08:31 AM2024-01-14T08:31:06+5:302024-01-14T08:35:11+5:30

Maldives Clashes With India: एका महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

dispute with india the maldives president muizzu big setback opposition party mdp won mayor election | भारताला नडले, जनतेने जागा दाखवली; मुइज्जू यांचा पक्ष स्थानिक निवडणुकीत पराभूत

भारताला नडले, जनतेने जागा दाखवली; मुइज्जू यांचा पक्ष स्थानिक निवडणुकीत पराभूत

Maldives Clashes With India: भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात मालदीवमधील मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांनंतर दोन्ही देशातील तणाव अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीन दौऱ्यावरून मायदेशात परतताच भारताविषयी सूचक विधान केले आहे. मात्र, भारताची घेतलेला पंगा मुइज्जू सरकारला महागात पडत असल्याचे चित्र आहे. एकीकडे विरोधक तसेच सरकारमधील सदस्य याबाबत तीव्र नाराज असल्याचे दिसत असून, दुसरीकडे जनतेने मुइज्जू यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकीत जागा दाखवली आहे. मुइज्जू यांचा पक्ष पराभूत झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना मोठा धक्का बसला आहे. मालदीवची राजधानी मालेच्या महापौर निवडणुकीत भारताचा समर्थक पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) मोठा विजय मिळवला आहे. एमडीपीचे उमेदवार एडम अझीम हे मालेचे नवे महापौर निवडून आले आहेत. हे पद आतापर्यंत मुइज्जूकडे होते. मुइज्जू यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी या पदाचा राजीनामा दिला होता.

एमडीपी पक्षाला विजयी आघाडी

विरोधी पक्षाचे एमडीपी नेते एडम अझीम यांनी ५,३०३ मतांनी मोठी आघाडी घेतली. तर मुइज्जू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) नेते ऐशथ अझीमा शकूर यांना केवळ ३,३०१ मते मिळाली. भारत समर्थक मानले जाणारे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलिह हे एमडीपी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. मोहम्मद सोलिह यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. महापौरपदाची निवडणूक जिंकल्यानंतर एमडीपीला एक प्रकारे संजीवनी मिळाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, चीनवरून मायदेशी परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुइज्जू म्हणाले की, भले आम्ही लहान देश असू शकतो, असे असले म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा भारताकडे होता, असे म्हटले जात आहे.
 

Web Title: dispute with india the maldives president muizzu big setback opposition party mdp won mayor election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.