दैवी चमत्कार! तुर्कीमध्ये भूकंपाच्या 21 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत घोडा सापडला, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 09:06 PM2023-02-28T21:06:31+5:302023-02-28T21:07:18+5:30

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 48,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Divine miracle! Live horse found under rubble 21 days after earthquake in Turkey, WATCH VIDEO | दैवी चमत्कार! तुर्कीमध्ये भूकंपाच्या 21 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत घोडा सापडला, पाहा VIDEO

दैवी चमत्कार! तुर्कीमध्ये भूकंपाच्या 21 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत घोडा सापडला, पाहा VIDEO

googlenewsNext


आदियामन: काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला. भूकंपानंतर अनेक दिवस ढिगाऱ्याखाली लोक सापडत होते. आता 21 दिवसांनी अदियामान शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक घोडा जिवंत सापडला आहे. तानसू येगेन नावाच्या युजरने ट्विटरवर एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये एक टीम हा घोडा ढिगाऱ्यातून काढताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले, 'अद्भुत, अद्भुत, अद्भुत... अदियामनमध्ये भूकंपानंतर 21 दिवसांनी इमारतीच्या ढिगाऱ्यात जिवंत सापडलेल्या घोड्याला टीमने वाचवले.' तुर्कस्तानमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर आदियमनला मोठा फटका बसला होता. हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत. येथे देशाच्या दक्षिणेकडील भागात सोमवारी 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला, जो आफ्टरशॉक असल्याचे मानले जाते.

या ताज्या भूकंपात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर आधीच जीर्ण झालेल्या काही इमारती जमीनदोस्त झाल्या. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीचे प्रमुख युनूस सेझर यांनी सांगितले की, सोमवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र मलात्या प्रांतातील येसिल्टर शहरात होते. या भूकंपात 69 लोक जखमी झाले, तर दोन डझनहून अधिक इमारती कोसळल्या.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 48,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 6 फेब्रुवारीच्या शक्तिशाली भूकंपापासून, या प्रदेशात सुमारे 10,000 आफ्टरशॉक झाले आहेत.

Web Title: Divine miracle! Live horse found under rubble 21 days after earthquake in Turkey, WATCH VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.