व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी; बायडेन यांच्याकडून सुनक यांचेही अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 08:35 AM2022-10-25T08:35:05+5:302022-10-25T08:35:24+5:30
भारतीय अमेरिकनांचे यजमानपद भूषवण्याचा आम्हाला सन्मान वाटत आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी तुमच्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो, असे बायडेन म्हणाले.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये यंदा दिवाळी साजरी करण्यात आली. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अनिवासी भारतीयांना पार्टी दिली. यावेळी बायडेन यांच्या पत्नी डा जिल यांनी तुमच्यामुळेच अमेरिका पुढे जात आहे, असे वक्तव्य केले.
भारतीय अमेरिकनांचे यजमानपद भूषवण्याचा आम्हाला सन्मान वाटत आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी तुमच्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो, असे बायडेन म्हणाले. हे सर्व आता अमेरिकन संस्कृतीचा भाग बनले आहे. व्हाईट हाऊसमध्ये आम्ही अधिकृतपणे दिवाळी साजरी करत आहोत, याचा आनंद असल्याचे बायडेन म्हणाले. या कार्यक्रमाला उप राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिसही उपस्थित होत्या.
#WATCH | US President Joe Biden, First lady Jill Biden and Vice-President Kamala Harris celebrate the festival of #Diwali at the White House pic.twitter.com/WPOOYSW2zo
— ANI (@ANI) October 24, 2022
आशियातील विशेषत: भारतीय लोकांमुळेच अमेरिका वेगाने प्रगती करत असल्याचे जिल बायडेन यांनी म्हटले आहे. सरकार त्यांच्या हितासाठी नेहमीच काम करत राहील. दिवाळीनिमित्त आज तुम्ही प्रेमाने आणि विश्वासाने या घरी पोहोचलात याबद्दल मी आभारी आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीही लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मी या ठिकाणाहून बाहेर जाण्यापूर्वी आम्ही प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालणार आहोत. हिंसक अतिरेक हा वाढता धोका आहे. द्वेषाला या देशात सुरक्षित अड्डा बनू देणार नाही, असेही बायडेन म्हणाले. ऋषी सुनक युकेचे पंतप्रधान बनणार आहेत. उद्या ते राजाला भेटण्यासाठी जातील. एक कृष्णवर्णीय व्यक्ती महत्वाच्या पदावर जात आहे, हे अभिमानास्पद आहे, असेही बायडेन म्हणाले.