अमेरिकेत दिवाळीची सार्वजनिक सुटी? कनिष्ठ सभागृहात विधेयक सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 05:42 AM2023-05-28T05:42:57+5:302023-05-28T05:43:14+5:30
भारतीय वंशाच्या ४४ लाख लोकांना दिवाळीची सार्वजनिक सुटी मिळण्याची शक्यता आहे.
वाॅशिंग्टन : अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीय वंशाच्या ४४ लाख लोकांना दिवाळीची सार्वजनिक सुटी मिळण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील एक विधेयक अमेरिकी काँग्रेसच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या कनिष्ठ सभागृहामध्ये सादर करण्यात आले आहे. अशा सुटीची डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर ग्रेस मेंग यांनी तशी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सरकारकडे केली होती.
यासंदर्भात ग्रेस मेंग यांनी सांगितले की, जगभरातील करोडो लोकांसाठी दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. अमेरिकेत क्वीन्स, न्यूयॉर्क व इतर भागांमध्ये भारतीय वंशाचे लाखो लोक राहात असून त्यांना दिवाळीची सुटी मिळायला हवी.