हिरोशिमा दौ-यात आण्विक हल्ल्याबद्दल माफी मागणार नाही - बराक ओबामा

By admin | Published: May 23, 2016 09:51 AM2016-05-23T09:51:35+5:302016-05-23T11:28:25+5:30

जपानमधल्या हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या दौ-यादरम्यान 'आण्विक हल्ल्या'बद्दल माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले.

Do not apologize for the nuclear strike in Hiroshima Dawa - Barack Obama | हिरोशिमा दौ-यात आण्विक हल्ल्याबद्दल माफी मागणार नाही - बराक ओबामा

हिरोशिमा दौ-यात आण्विक हल्ल्याबद्दल माफी मागणार नाही - बराक ओबामा

Next
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. २३ - या महिनाअखेरीस जपानमधल्या हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या दौ-यादरम्यान 'आण्विक हल्ल्या'बद्दल माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुस-या महायुद्धात हिरोशिमावर अमेरिकेने दोनदा अणुबॉम्ब टाकल्यानंतर बराक ओबामा हे हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. मात्र अमेरिकेकडून हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकल्याबाबत ते माफी मागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
(अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हिरोशिमाला भेट देणार) 
 
जपानमधील नॅशनल ब्रॉडकास्टर 'एनएचके'ला (NHK) दिलेल्या मुलाखतीदरम्यान ओबामा यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. 'संघर्षाच्या वा युद्धाच्या काळात नेत्यांना अनेक वेळेस अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात याची मला कल्पना आहे.  (नेत्यांच्या) या निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित करणे आणि सत्य माहिती जाणणे हे इतिहासकारांचे कामच आहे' असे ओबामा यांनी सांगितले. 
अणुशक्तीबाबत ओबामांनी वेळोवेळी जनजागृती केल्याबाबत त्यांना 2009ला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 27 मे रोजी जगातला सर्वात पहिला अणुबॉम्ब बनवणा-या ठिकाणी ओबामा जपानचे पंतप्रधान शिंजो अबेंसोबत भेट देणार आहेत. ओबामांनी आण्विक शक्तीशिवायही जगाला शांती आणि सुरक्षा मिळू शकते, याचं महत्त्व पटवून दिलं होतं, अशी माहिती व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आली. 21 ते 28 मेदरम्यान ओबामा आशियाच्या दौ-यावर असून  त्यादरम्यान जपानसह सात देशांचे प्रतिनिधी या समीटमध्ये सहभागी होणार आहेत. 
 
71 वर्षांपूर्वी दुस-या महायुद्धात हिरोशिमातल्या मेमोरिअल पार्कजवळ अमेरिकेचे लढाऊ विमान पाडलं होतं. त्या ठिकाणालाही बराक ओबामा भेट देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडून देण्यात आली आहे. 6 ऑगस्ट 1945ला अमेरिकेकडून हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. या अणुबॉम्बच्या हल्ल्यात जपानमधले हजारो लोक मारले गेले होते. त्या वर्षाअखेरीस जवळपास 1 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेकडून दुसरा अणुबॉम्ब नागासाकी शहरावर टाकण्यात आला होता. सहा दिवसांनंतर जपाननं अमेरिकेसमोर आत्मसमर्पण केलं होतं. अमेरिकेतलं जनजीवन वाचवण्यासाठी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र या स्पष्टीकरणावर जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे असमाधानी आहेत. हिरोशिमातल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यात वाचलेल्या लोकांनी अमेरिकेनं या प्रकारावर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. 

 

Web Title: Do not apologize for the nuclear strike in Hiroshima Dawa - Barack Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.