न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला

By Admin | Published: September 16, 2016 03:52 PM2016-09-16T15:52:55+5:302016-09-16T15:53:52+5:30

परवानगीशिवाय लहानपणीची छायाचित्रे फेसबुकवर टाकली म्हणून एका 18 वर्षाच्या ऑस्ट्रियन मुलीने पालकांना कोर्टात खेचले आहे.

Do not ask a girl's girl on Facebook for a girl's case | न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला

न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
व्हिएन्ना, दि. 16 - परवानगीशिवाय लहानपणीची छायाचित्रे फेसबुकवर टाकली म्हणून एका 18 वर्षाच्या ऑस्ट्रियन मुलीने पालकांना कोर्टात खेचले आहे. आई वडिलांनी या मुलीच्या लहानपणीचे जवळपास 500 फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकले असून ते त्यांच्या जवळपास 700 फेसबुक फ्रेंड्सशी शेअर झाले. या फोटोंमध्ये अनेक फोटो सदर मुलगी अगदी लहान असतानाचे व तिच्या बाललीलांचा समावेश असतानाचे आहेत. माझे बालपणीचे नग्नावस्थेतले फोटो सोशल मीडियावर बघून माझी काय अवस्था झाली असेल व मला किती शरम वाटली असेल याची कल्पना येणार नाही असे या मुलीने म्हटले आहे. बालपणापासूनच्या प्रत्येक अवस्थेचे छायाचित्र काढण्यात आले आणि तीसगळी छायाचित्रे जगाबरोबर शेअर करण्यात आली, असे तिने म्हटले आहे. याखेरीज या मुलीने आईवडिलांकडे हे फोटो डिलीट करण्याची विनंती केली, जी त्यांनी मान्य केली नाही.
मुलीचे फोटो काढण्याचा व ते प्रसिद्ध करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा तिच्या वडिलांचा दावा आहे. आता कुणाची बाजू बरोबर, असे फोटो परवानगीखेरीज प्रसिद्ध न करणे हा मुलीचा अधिकार का प्रसिद्ध करणे हा पालकांचा अधिकार याचा फैसला कोर्टाला करायचा आहे. 
ऑस्ट्रियामध्ये हा असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे, माक्ष अन्य काही देशांमध्ये अशा प्रकरणांमध्ये पालकांना नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार असून त्याचा परिणाम अगणित घरांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे.

Web Title: Do not ask a girl's girl on Facebook for a girl's case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.