'अमेरिकेसमोर झुकू नका, आपल्याकडे मोठं सैन्य आणि दारुगोळा आहे', मसूद अजहरची पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 01:57 PM2018-01-11T13:57:50+5:302018-01-11T14:02:07+5:30

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पाकिस्तानला अमेरिकेपुढे न झुकण्याचं तसंच त्यांच्या मागण्या न स्विकारण्याचं आवाहन केलं आहे.

Do not bow before US, Masood Azhar urge Pakistan to go against US | 'अमेरिकेसमोर झुकू नका, आपल्याकडे मोठं सैन्य आणि दारुगोळा आहे', मसूद अजहरची पोकळ धमकी

'अमेरिकेसमोर झुकू नका, आपल्याकडे मोठं सैन्य आणि दारुगोळा आहे', मसूद अजहरची पोकळ धमकी

googlenewsNext

इस्लामाबाद - दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पाकिस्तानला अमेरिकेपुढे न झुकण्याचं तसंच त्यांच्या मागण्या न स्विकारण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या जमिनीवरुन कार्यरत असणा-या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका ऑडिओ मेसेजत्या माध्यमातून मसूद अजहर बोलला आहे की, 'पाकिस्तानी मीडिया आणि बुद्धीजीवी लोक डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी पुर्ण करण्याचा सल्ला देत पाकिस्तानमधील लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत'. मसूद अजहर याचं वक्तव्य अशावेळी आलं आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि धोका दिल्याचा आरोप केला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला सुरक्षेसाठी देण्यात येणारी आर्थित मदत थांबवली आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत रोखली असल्या कारणाने हक्कानी नेटवर्कवर बंदी आणावी की नाही यावर वाद-विवाद सुरु आहे. हक्कानी नेटवर्क पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याऐवजी जनकल्याण कार्यक्रमांचं आयोजन करतात, मात्र हेच लोक भारत, अफगाणिस्तानसहित इतर देशांत दहशतवादी कारवाया घडवून आणतात.

मसूद अजहर बोलला आहे की, 'आपल्याकडे मोठी लष्करी ताकद तसंच न्यूक्लिअर असतानाही पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनंतर घाबरलं आहे. पाकिस्तानने अमेरिकेसोबत कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही. अमेरिका एकटी नाहीये, त्यांच्यासोबत भारतही आहे, हे विसरता कामा नये'. पुढे तो बोलला की, 'जर पाकिस्तानला स्वत:ला वाचवायचं असेल तर सर्वात आधी त्याला अमेरिकेपासून मुक्त झालं पाहिजे. जो अमेरिका अफगाणिस्तानात तालिबानला नाही हरवू शकलं तो पाकिस्तानचं काय वाकडं करणार'.

मसूद अजहरला 1994 मध्ये भारतीय सुरक्षा जवानांनी अटक केली होती. पण पाच वर्षानंतर 1999 मध्ये कंधार विमान अपहरण करत दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस ठेवत त्यांच्या बदल्यात मसूद अजहरची सुटका केली होती. सध्या मसूद अजहरची जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटना अडचणीत सापडल्या आहेत. त्यात जर पाकिस्तानने अमेरिकेच्या म्हणण्यानुसार कारवाई केली तर अडचणीत आणखी भर पडणार आहे. मसूद अजहरची दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानी लष्कराशी जवळील संबंध आहेत. पाकिस्तान लष्करच त्यांना मदत करत असाही आरोप आहे. 
 

Web Title: Do not bow before US, Masood Azhar urge Pakistan to go against US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.