..तर हस्तक्षेप करूच -ओबामा

By admin | Published: August 10, 2014 03:13 AM2014-08-10T03:13:47+5:302014-08-10T03:13:47+5:30

इराकमधील सुन्नी बंडखोरांविरोधातील कारवाईचे समर्थन करत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निदरेष लोकांचा बळी जात असल्यास अमेरिका हस्तक्षेप करत राहील असे स्पष्ट केले.

Do not interfere. - Obama | ..तर हस्तक्षेप करूच -ओबामा

..तर हस्तक्षेप करूच -ओबामा

Next
>वॉशिंग्टन : इराकमधील सुन्नी बंडखोरांविरोधातील कारवाईचे समर्थन करत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निदरेष लोकांचा बळी जात असल्यास अमेरिका हस्तक्षेप करत राहील असे स्पष्ट केले. शनिवारी त्यांनी राष्ट्राला उद्देशून आठवडी  भाषण केले. दरम्यान, इराकमध्ये   पुन्हा युद्ध छेडणार नसल्याचे             स्पष्ट करत ओबामांनी कोणत्याही परिस्थिती इस्लामिक खिलाफत स्थापन होऊ देणार नसल्याचा इशारा दिला.
ओबामा म्हणाले, ‘जगभरात कुठे कोणते संकट आल्यास अमेरिका प्रत्येक वेळी हस्तक्षेप करू शकत नाही आणि करण्याची इच्छाही नाही. मात्र, या पर्वतावर शेकडो लोक जीव मुठीत घेऊन बंडखोरांपासून स्वत:चा बचाव करत आहेत. आमच्यात अशा घटना रोखण्याची धमक असून अमेरिका त्याकडे कानाडोळा करू शकत नाही. आम्ही कोण आहोत हा मुद्दा नाही. आम्ही अमेरिकी पुढे येऊन निर्णय घेतो.’
ओबामांनी सांगितले की, अमेरिकी सैन्याला इर्बिलमध्ये कार्यरत आपले मुत्सद्दी व सैन्य सल्लागार यांच्या संरक्षणासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इस्लामिक स्टेटने मोठय़ा प्रमाणात भूभाग ताब्यात घेण्यासह इराकमधील सर्वात मोठय़ा धरणावरही नियंत्रण मिळविले असून  त्यांच्याद्वारे धार्मिक अल्पसंख्याकांना घरे सोडण्यासाठी बळजबरी केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर इराकमध्ये अमेरिकी लढाऊ विमाने पुन्हा पाठवण्याचा ओबामांनी आदेश दिला आहे. 
विमानाद्वारे अन्न पुरवठा
इराकमध्ये सुन्नी बंडखोरांच्या तळांवर शुक्रवारी हल्ला सुरू केल्यानंतर हिंसक कारवायांपासून बचावासाठी  सिंजार पर्वतात लपून बसलेल्या हजारो नागरिकांना शनिवारी अमेरिकेने विमानाद्वारे अन्न-पुरवठा केला. 
रक्तपात घडवण्याची धमकी
इराकमध्ये बंडखोरांच्या तळावर हवाई हल्ले सुरू केल्यानंतर अमेरिकेला या दहशतवाद्यांकडून धमक्या मिळत आहेत. इंटरनेटवर अमेरिकी दूतावास आत्मघाती हल्ल्याने उडवण्यासोबतच अमेरिकी सैनिक व सामान्य नागरिकांचे प्राण घेण्याची बंडखोरांनी धमकी दिली आहे. (वृत्तसंस्था)
 
4बगदाद : सुन्नी दहशतवाद्यांनी ‘अनैतिक हेतूने’ अल्पसंख्याक यजीदी समूहातील शेकडो महिलांना ओलीस ठेवल्याची माहिती एका इराकी अधिका:याने दिली. इराकी मानवाधिकार मंत्रलयाचे प्रवक्ता कामिल अमीन यांनी सांगितले की, 35 वर्षाहून कमी वय असलेल्या शेकडो यजीदी महिलांना मोसूलमधील शाळांत ओलीस ठेवले आहे. 
 
4मोसूल हे इराकमधील दुस:या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. ओलिसग्रस्त कुटुंबियांद्वारे मंत्रलयाला ही माहिती मिळाली. मानवी व इस्लामी मूल्यांविरुद्ध असलेल्या ‘अनैतिक हेतूसाठी’ या महिलांचा वापर केला जाण्याची भीती या अधिका:याने व्यक्त केली.
 
हवाई हल्ल्याची
व्याप्ती, काळ मर्यादित
4अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमधील हवाई हल्ल्यांची व्याप्ती आणि काळ मर्यादित असल्याचा दावा केला आहे. इराकच्या काही भागांत सुन्नी बंडखोरांविरोधातील या कारवाईबद्दल त्यांनी अमेरिकी प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष जॉन बोहनर यांना एका पत्रद्वारे ही माहिती दिली.

Web Title: Do not interfere. - Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.