भारतविरोधी वक्तव्ये करू नका - नवाज शरीफ यांचा मंत्र्यांना दम
By admin | Published: December 19, 2015 01:22 PM2015-12-19T13:22:03+5:302015-12-19T13:22:24+5:30
भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ - भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे. शरीफ यांच्या निकटवर्तीय अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांनी त्यांचे मंत्री तसेच वरिष्ठ अधिका-यांना दम दिला असून भारत- पाकिस्तानदरम्यान शांतता चर्चेत अडथळा येईल असेही कोणतेही चिथावणईखोर वक्तव्य करण्यास मनाई केली आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
' एकमेकांचा भूतकाळ उकरून उणीदुणी काढण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रांमधील संवादप्रक्रिया वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, अशीच वक्तव्ये करण्यात यावीत. शांतता प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे, असे शरीफ यांनी त्यांचे निकटवर्तीय तसेच मंत्रीमंडळातील मंत्री व वरिष्ठ अधिका-यांना बजावले आहे', असे या वृत्तात म्हटले आहे.
भारतसोबतचे संबंध वृद्घिंगत करण्यासाठी शरीफ उत्सुक असून त्यामुळे संपूर्ण देशाला फायदा होणार आहे.