हिंसेसाठी परमेश्वराच्या नावाचा वापर नको

By admin | Published: May 27, 2014 06:02 AM2014-05-27T06:02:30+5:302014-05-27T06:02:30+5:30

ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांनी बहीण-भावासारखे एकमेकांचा आदर करत गुण्यागोविंदाने राहावे, असे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले आहे

Do not use the name of the Lord for violence | हिंसेसाठी परमेश्वराच्या नावाचा वापर नको

हिंसेसाठी परमेश्वराच्या नावाचा वापर नको

Next

जेरूसलेम : ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांनी बहीण-भावासारखे एकमेकांचा आदर करत गुण्यागोविंदाने राहावे, असे आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले आहे. सर्व धर्मीयांनी एक-दुसर्‍यावर प्रेम करत हिंसेसाठी ईश्वराच्या नावाचा वापर करू नये, असे ते म्हणाले. पोप सध्या मध्य आशियाच्या दौर्‍यावर आहेत. पोप यांनी येथील जगप्रसिद्ध अल अक्सा मशिदीला भेट दिली. त्यांनी मशिदीच्या मुख्य मुफ्तींशी बातचीत केली. मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्मीयांनी ‘न्याय व शांतता यासाठी मिळून मिसळून काम करण्याची गरज आहे,’ असे आवाहन त्यांनी केले. उल्लेखनीय म्हणजे पोप यांनी लिखित भाषणाला फाटा देत उत्स्फूर्तपणे जेरूसलेमचे मुख्य मुफ्ती आणि अन्य मुस्लिम धर्मगुरूंना ‘प्रिय मित्रांनो’ याऐवजी ‘प्रिय बंधंूनो’ असे संबोधले. ते म्हणाले, आम्ही न्याय व शांततेसाठी मिळून काम करण्याची गरज आहे. दुसर्‍यांचे दु:ख समजणे जाणा आणि हिंसेसाठी ईश्वराचे नामस्मरण करू नका. या कार्यक्रमानंतर पोप यांनी इस्लाममधील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वांत पवित्र स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोम आॅफ द रॉकमध्ये प्रवेश केला. पोप फ्रान्सिस यांनी ज्यूंचे सर्वांत पवित्र स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेस्टर्न वॉल येथे गेले. येथे त्यांनी रब्बी शम्यूएल राबिनोविच यांच्याशी बातचीत केली. त्यांनी जवळपास अडीच मिनिटे वॉलवर प्रार्थनाही केली. माऊंट हर्ज्ल येथे दफन करण्यात आलेले इस्रायली नेते आणि सैनिकांना पोप श्रद्धांजली अर्पण करणार आहेत, असे करणारे ते पहिले पोप ठरतील. इस्रायली राष्ट्राध्यक्ष शिमोन पेरेज आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशीही पोप बातचीत करणार आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Do not use the name of the Lord for violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.