‘त्या’ देशांना वेगळे पाडा!

By Admin | Published: September 5, 2016 04:06 AM2016-09-05T04:06:23+5:302016-09-05T04:06:23+5:30

दहशतवादाशी लढण्यासाठी संयुक्तपणे व जोरदार प्रयत्न ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांनी एकत्रित अशी कृती करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.

Do those 'different' countries! | ‘त्या’ देशांना वेगळे पाडा!

‘त्या’ देशांना वेगळे पाडा!

googlenewsNext


हँगझोऊ (चीन) : दहशतवादाचे पाठिराखे व त्यांचे प्रायोजक यांना वेगळे पाडण्यासाठी व दहशतवादाशी लढण्यासाठी संयुक्तपणे व जोरदार प्रयत्न ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांनी एकत्रित अशी कृती करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.
ब्रिक्स देशांच्या नेत्यांच्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मोदी जोरदारपणे केलेल्या भाषणात म्हणाले की ‘‘दक्षिण अशिया असो किंवा कुठेही दहशतवाद्यांकडे बँका किंवा शस्त्रांचे कारखाने असत नाहीत. कोणी तरी त्यांना पैसा आणि शस्त्रे पुरवत आहे. ब्रिक्स देशांनी दहशतवादाशी लढण्यासाठी केवळ संयुक्त जोरदार प्रयत्नच करावेत असे नाही तर दहशतवादाला पैसा पुरवून त्याचे प्रायोजकत्व करणाऱ्यांना वेगळे पाडण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.’’ मात्र मोदी यांनी पाकचे नाव घेतले नाही. (वृत्तसंस्था)
>परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की,‘‘मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. दहशतवाद हा या क्षणाला मुख्य आव्हान बनले असून आम्ही जर त्याविरुद्ध एकत्रितपणे भूमिका घेतली नाही तर त्याला पराभूत करणे अशक्य बनेल.’’
>मोदी-ओबामांची अल्पकाळ भेट
हांगझोवू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे भरलेल्या जी-२० शिखर परिषदेस उपस्थित असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन केले. सर्व नेत्यांचे एकत्रित छायाचित्र काढताना मोदी व ओबामा यांची अल्पकाळ भेट झाली. त्याआधी मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनाही भेटले.
>अधिकाऱ्यांत झाला वाद
अमेरिका आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यावरून विमानतळावरील धावपट्टीवर क्षुल्लक भांडण झाले. उभय देशांत मानवी हक्क आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य यात अंतर असल्याचेही दिसले, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रविवारी व्यक्त केले.
चीनच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस व इतर अधिकाऱ्यांना ओबामा यांचे आगमन व्हायच्या वेळी या शहरात पत्रकारांना प्रवेश देण्यावरून त्रास दिला. ओबामा यांच्या आगमनाचे चित्रीकरण करण्यासाठी अमेरिकन वार्ताहरांना जागा करून देण्याचा प्रयत्न व्हाइट हाउसचे कर्मचारी करीत असताना एका अधिकाऱ्याने ‘हा आमचा देश आहे, हा आमचा विमानतळ आहे’ अशी घोषणा दिली. हा उद्रेक कॅमेऱ्यांनी टिपला.
असे प्रसंग चीनसाठी नवे नाहीत, असे ओबामांनी सांगितले. आम्ही जे काम करतो त्यासाठी वृत्तपत्रांना तेथे प्रवेश असला पाहिजे, असे आम्हाला महत्त्वाचे वाटते. हे मतभेद चीनच्या अध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेतही दिसल्याचे ओबामा म्हणाले.
संबंध टिकवायचे आहेत !
हँगझोऊ (चीन) : चीनला भारताबरोबर कष्टाने निर्माण केलेले चांगले संबंध टिकवायचे आहेत व द्विपक्षीय संबंधांना चालना द्यायची आहे, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना म्हणाले. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) प्रकल्पावरून मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि जिनपिंग यांच्यात रविवारी चर्चा झाली.
> बे्रक्झिटनंतरचे दिवस सोपे नाहीत : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे मत
लंडन : ब्रेक्झिटनंतरचे दिवस हे काही साधेसोपे नसतील, असा इशारा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी रविवारी दिला. गेल्या जून महिन्यात देशात घेण्यात आलेल्या जनमतामध्ये ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ब्रिटनला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.जुलै महिन्यात पंतप्रधान बनलेल्या थेरेसा यांनी प्रथमच बीबीसीला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे हे काही सोपे काम नाही; परंतु मी आशावादी आहे. ईयूमधून ब्रिटन बाहेर पडला असून, आम्ही ते यशस्वी करून दाखवू, असेही त्या म्हणाल्या. जी-२० शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी त्या बोलत होत्या.

Web Title: Do those 'different' countries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.