तुम्हाला कॉफीचा चस्का आहे? त्याशिवाय तुम्हाला राहवत नाही?
By admin | Published: June 7, 2017 06:13 PM2017-06-07T18:13:55+5:302017-06-07T18:13:55+5:30
-तर मग हे १२ फायदे खास तुमच्याचसाठी. कॉफी पिता पिता वाचा आणि व्हा फ्रेश..
- मयूर पठाडे
कॉफी. तुमच्यातले किती जण पितात? आणि कॉफीचे तुम्ही किती अॅडिक्ट आहात? कॉफी प्याल्याशिवाय तुम्हाला होतच नाही, त्याशिवाय तरतरीच येत नाही असं होतं का? त्याबद्दल तुम्हाला अनेकांनी खबरदारीचा सल्लाही दिला असेल. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका पोहोचतो, हे एव्हाना सगळ्यांनीच ऐकलं आहे आणि त्यांना ते माहीतही आहे, पण याच कॉफीचे अनेक उपयोग आहेत, आणि तुमच्या शरीरावर, आरोग्यावरही त्याचा सकारात्मक उपयोग होतो, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर?
..तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी निश्चितच नाही. शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांनी कॉफी तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे शोधून काढलं आहे.
१- कॉफीमुळे तुमच्यातील नकारात्मकता कमी होते.
२- तुमच्यातलं डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं.
३- कॉफीतल्या कॅफिनमुळे मेंदुतल्या एंझाइम्सला खूप ताकद मिळते.
४- त्यामुळे न्यूट्रॉन्सला संरक्षण मिळतं.
५- आपली न्यूट्रॉन्स पॉवर मजबूत होते.
६- ह्युमिनिटी पॉवर वाढते.
७- कोलेस्टेरॉल कमी होतं.
८- आत्महत्येचे विचार कमी होतात.
९- हार्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थनं केलेल्या दुसऱ्या एका अभ्यासानुसार ज्या महिला दिवसभरात चार कप किंवा त्यापेक्षा अधिक कॉफी पितात, त्यांच्यातलं डिप्रेशन सुमारे वीस टक्क्यांनी कमी होतं.
१०- कॉफीमध्ये सुमारे १.८ ग्रॅम फायबर असतं. दिवसाला प्रत्येकानं २० ते ३८ ग्रॅम फायबर प्रत्येकाच्या शरीरात गेलं पाहिजे असा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. कॉफीमुळे अनायासे हे फायबर मिळतं.
११- याशिवाय २०१५मध्ये केलेला एक अभ्यास सांगतो, कॉफीमुळे तणाव आणि थकान कमी होते.
१२- कॉफीमुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या शरीरात होतो.