65 वर्षांच्या आजीला व्हिसासाठी मुलाखत द्यावी लागेल का?
By admin | Published: June 26, 2017 07:38 AM2017-06-26T07:38:25+5:302017-06-26T07:38:25+5:30
माझ्या 65 वर्षांच्या आजीला व्हिसासाठी अर्ज करायचा आहे. पण ती व्हीलचेअरवर असते. तिला मुलाखतीसाठी यावं लागेल का?
Next
style="text-align: justify;">प्रश्न - माझ्या 65 वर्षांच्या आजीला व्हिसासाठी अर्ज करायचा आहे. पण ती व्हीलचेअरवर असते. तिला मुलाखतीसाठी यावं लागेल का?
उत्तर - होय, तुमच्या आजीला मुलाखतीसाठी यावं लागेल. बहुतेक सगळ्या प्रकरणांमध्ये व्हिसाची प्रक्रिया अनिवार्य असते. वृद्ध व्यक्ती अथवा अपंग व्यक्तिंकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तुमच्या आजीची अथवा कुठल्याही वृद्ध अथवा अपंग व्यक्तिची व्हिसा मुलाखतीची प्रक्रिया सुरळित व्हावी यासाठी कॉन्सुलेटचे कर्मचारी मदत करतील. कॉन्सुलेटमध्ये व्हीलचेअर नेण्याची सुविधा आहे. आणि कॉन्सुलेटचे कर्मचारीही आवश्यक तिथे व्हीलचेअरची सुविधा देतील.
तुमच्या आजीला सोबतीची गरज असेल तर तिच्यासह कुटुंबातील सदस्यही मुलाखतीच्यावेळी येऊ शकतात. जर आजीसोबत कुणी नातेवाईक येऊ शकत नसतील तरी हरकत नाही. आम्ही गुजराती, मराठी आणि हिंदी भाषेतून संवाद साधता येणारी व्यवस्था करतो आणि मुलाखत नीट पार पडेल याची काळजी घेतो.
अर्थात, याबाबतीत काही अपवाद आहेत. नॉनइमिग्रंट व्हिसासाठी 79 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तिंनी किंवा 14 वर्षांपेक्षा लहान मुलांनी अर्ज केला असेल तर व्यक्तिगत मुलाखतीत सूट मिळू शकते. वैध व्हिसाचे किंवा एक वर्षापेक्षा कमी कालावधीत बाद झालेल्या व्हिसाचे नूतनीकरण करतानाही अर्जदाराला मुलाखत न देऊन चालू शकते. मुलाखत कधी अनिवार्य आहे आणि कधी टाळता येऊ शकते याबाबत www.ustraveldocs.com/in या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिलेली आहे. मात्र, इमिग्रंट किंवा स्थलांतरीताच्या व्हिसासाठी सगळ्या अर्जदारांना मुलाखत ही अनिवार्य आहे.
आणखी वाचा...