डॉक्टरने ८० पेक्षा जास्त महिलांसोबत केलं गैरवर्तन आणि मग झालं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:13 PM2022-02-25T14:13:56+5:302022-02-25T14:16:22+5:30
Scotland : इतकंच नाही तर डॉक्टरवर आरोप आहे की, त्याने इमरजन्सी डिपार्टमेंटमध्ये एका महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला. आता कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
स्कॉटलॅंडच्या (Scotland) नॉर्थ लॅनार्कशायरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरवर (Doctor) आरोप आहे की त्याने जवळपास ८० महिलांसोबत गैरवर्तणूक केली. त्याने काही महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर काही महिलांना जबरदस्ती किस केलं.
'द मिरर' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, डॉक्टरने साधारण ३५ वर्षात ८० पेक्षा जास्त महिलांसोबत गैरवर्तणूक केली. आरोपी डॉक्टरचं नाव कृष्णा सिंह आहे. त्याचं वय ७२ वर्षे आहे. स्कॉटलॅंडच्या नॉर्थ लॅनार्कशायरमध्ये त्याचं क्लीनिक आहे. डॉक्टरवर आरोप आहे की त्याने १९८३ ते २०१८ पर्यंत हे प्रकार केले.
इतकंच नाही तर डॉक्टरवर आरोप आहे की, त्याने इमरजन्सी डिपार्टमेंटमध्ये एका महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला. आता कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
चुकीच्या पद्धतीने डॉक्टरने स्पर्श केला
पीडित महिलांनी असेही आरोप लावले आहे की, डॉक्टर त्यांना जबरदस्ती किस केलं आणि जेव्हा त्यांनी याचा विरोध केला तर तो त्यांच्यासोबत तो चिडून खालच्या भाषेत बोलला. आरोप आहे की, स्टेथोस्टोकने चेक करताना डॉक्टर महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता.
डॉक्टरने त्याच्यावर लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. आरोपी डॉक्टरच्या वकिलाने सांगितलं की, डॉक्टर अनेक केसेसमध्ये निर्दोष सिद्ध झाला आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप कोर्टात खोटे ठरतील.
आरोपी डॉक्टर हा मूळचा भारतातील आहे. त्याने बिहारच्या पटनामधील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतलं. तो १९७६ मध्ये यूनायटेड किंगडमला गेला आणि प्रॅक्टिस सुरू केली.